नवी दिल्ली : नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या ( stock exchange)माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांनी गोपनीय माहिती एका हिमालयात बसलेल्या योगी बाबांशी शेअर केल्याने त्या वादात अडकल्या आहेत.
स्टॉक एक्सचेंज अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंडजच्या (NSE) माजी सीईओ चित्रा रामकृष्ण (Chitra Ramkrishna) वादात अडकल्या आहेत. कारण त्या स्टॉक एक्सचेंजचे निर्णय घेण्यासाठी चक्क हिमालयात बसलेल्या एका योगी बाबांची मदत घेत होत्या. मार्केट रेग्युलेटर सेबीने त्यांच्यावर हे आरोप लावले असून महत्त्वाची आणि गोपनीय माहिती शेअर केल्याबद्दल त्या वादात अडकल्या आहेत. NSE चा आगामी पाच वर्षातील काय प्लॅन आहे?, कोणते मोठे निर्णय घेतले जाणार आहेत? अशी सारी माहिती त्या शेअर करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेनं याबाबतची माहिती दिली आहे.
सेबीने (SEBI) दिलेल्या माहितीनुसार चित्रा या हिमालयातील एका योगी बाबांच्या सल्ल्यानुसार सर्व निर्णय घेत होत्या. या बाबांच्या सल्लानंतरच त्यांनी आनंद सुब्रहमण्यम यांना एक्सचेंजचे ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून नियुक्त केलं होतं. सेबीने चित्रा रामकृष्ण आणि यात सामिल इतर काही व्यक्तीबाबत शुक्रवारी एक आदेश काढत ही माहिती दिली. सेबीकडून या सर्वांना दंड देखील ठोठावण्यात आला आहे. सुब्रहमण्यम यांच्या नियुक्तीमध्ये चूकीच्या पद्धतीने निर्णय घेतल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आल्याचे यावेळी सेबीकडून सांगण्यात आलं आहे
चित्रा रामकृष्ण या एप्रिल, 2013 ते डिसेंबर, 2016 पर्यंत नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या एमडी आणि सीईओ राहिल्या आहेत. त्या संबधित योगी बाबांना शिरोमणी म्हणत असून त्यांच्या मते त्यांच्याकडे एक अध्यात्मिक शक्ती होती. त्यामुळे मागील 20 वर्ष त्या व्यक्तीगत आणि व्यावसायिक गोष्टींमध्ये त्यांचा सल्ला घेत होत्या.
चित्रा यांच्यावर तीन वर्षांची बंदी
चित्रा रामकृष्ण आणि सुब्रहमण्यम यांना तीन वर्षांसाठी बाजारातील सर्व कामाकाजात बॅन करण्यात आलं आहे. सेबीने यासह NSE ला रामकृष्ण यांच्याकडून 1.54 कोटी रुपयांचा स्थगित बोनस आणि अतिरिक्त रजेच्या बदल्यात दिलेले 2.83 कोटी रुपये जप्त करण्याचे निर्देश दिले आहेत.
EPFO Facility: पीएफ खात्यातूनही LIC प्रीमियम भरता येतो, जाणून घ्या EPFO च्या कामाचे नियम