पुणे चित्रपट महोत्सवाच्या थीमची घोषणा

पुणे  : विसाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अर्थात पीफ 2022 च्या थीमची घोषणा आज करण्यात आली…भारतरत्न पंडित भीमसेन जोशी भारतरत्न सत्यजित रे आणि पद्मश्री साहिर लुधियानवी यांच्या जन्मशताब्दी वर आधारित या वर्षीची थीम असणार आहे. अशी माहिती आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक डॉक्टर जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा महोत्सव ऑनलाईन तसेच ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.. यंदा पिफ मधील चित्रपट तीन ठिकाणच्या आठ पडद्यांवर दाखविले जाणार आहेत.

ऑनलाइन माध्यमातून 26 निवडक चित्रपट दाखवले जातील तर ऑफलाईन माध्यमातून 120 चित्रपटांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. ऑनलाइन माध्यमासाठी 600 रुपये तर ऑफलाइन माध्यमासाठी 700 रुपये प्रति व्यक्ती असे नोंदणी शुल्क आकारले जाणार आहे… हे चित्रपट सेनापती बापट रस्त्यावरील पीव्हीआर लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि वेस्टन मॉल मधील औंध येथील सिनेपोलीस या चित्रपटगृहांमध्ये दाखविले जातील… महोत्सवात सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला 15 फेब्रुवारी पासून सुरुवात होणारे 3 मार्च ते 10 मार्च दरम्यान सुरु असेल…

चित्रपट महोत्सवाच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट इंडिया डॉट कॉम (www.india.com)या संकेतस्थळावर 15 फेब्रुवारी पासून करता येईल प्रत्यक्ष नोंदणी 17 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे या महोत्सवात हंगेरी युक्रेन स्पेन जर्मनी इटली फ्रान्स रशिया इत्यादी देशातील चित्रपटांचा समावेश वर्ल्ड कॉम्पिटिशन श्रेणीत निवडल्या गेलेल्या चित्रपटांच्या यादीत करण्यात आला आहे अशीही माहिती पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक जब्बार पटेल यांनी यावेळी दिली. या दरम्यान आयोजन समितीचे सदस्य रवी गुप्ता अभिजीत रणदिवे सतीश आळेकर मोहन आगाशे आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम आदी मान्यवर उपस्थित होते.


Jhund : ‘आया ये झुंड है…’; झुंडचे  हिट गाणे रिलीज

Single : प्रथमेश परब आणि अभिनय बेर्डेची हास्यधमाल जोडी दिसणार ‘सिंगल’ चित्रपटात !

Social Media