अमरावतीत नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक, सत्तारूढ पुन्हा सत्तेत

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील दोन नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली आहे.यात पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्त्वात तिवसा नगर पंचायतीवर पुन्हा काँग्रेसची सत्ता स्थापन झाली आहे.

तिवसा नगरपंचायत अध्यक्षपदी काँग्रेसचे योगेश वानखडे तर उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसच्याच प्रिया विघ्ने यांची निवड झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवणुकीत काँग्रेसच्या योगेश वानखडे यांनी शिवसेनेचे अनिल थुल यांचा चार मताने पराभव केला.

भातकुली नगपंचयातीवर आमदार रवी राणा(MLA Ravi Rana) यांच्या नेतत्त्वात युवा स्वाभिमान पक्षाचा झेंडा पुन्हा फडकला आहे. नगराध्यक्ष पदी योगिता कोलटक्के तर उपाध्यक्षपदी प्रतीक कोलमकर विराजमान झाले आहेत. योगिता कोलटक्के यांनी शिवसेनेच्या स्वाती बुध यांचा पाच मतांनी पराभव केला.
या निवडणुक झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून विजय जल्लोश साजरा केला आहे.


उद्योजक राहुल बजाज अनंतात विलीन

शिवभोजन केंद्रावरील गैर प्रकार खपवून घेणार नाही : मंत्री छगन भुजबळ

Social Media