मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित अनेक मालिका आणि चित्रपट प्रेक्षकांसमोर आले आहेत. शिवरायांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा त्यामागचा उद्देश आहे.
सिंहगड(Sinhagad) : बाबुराव पेंटर दिग्दर्शित ‘सिंहगड’ हा चित्रपट 1923 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात बाबुराव पेंटर आणि व्ही.शांताराम मुख्य भूमिकेत होते.
बाळ शिवाजी(Bal Shivaji) : ‘बाळ शिवाजी’ हा शिवाजी महाराजांच्या बालपणीच्या साहसांवर आधारित चित्रपट आहे. हा चित्रपट 1981 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभाकर पेंढारकर यांनी केले होते.
छत्रपती शिवाजी(Chhatrapati Shivaji) : ‘छत्रपती शिवाजी’ चित्रपटाचे दिग्दर्शन भालजी पेंढारकर यांनी केले आहे. हा चित्रपट 1952 मध्ये प्रदर्शित झाला होता.
कल्याण खजिना (Kalyan Khajina): शिवाजी महाराजांनी कल्याणचा खजिना कसा लुटला हे कल्याण खजिना या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. बाबुराव पेंटर यांनी 1924 मध्ये या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
शेर शिवाजी(Sher Shivaji) : ‘शेर शिवाजी’ हा चित्रपट 1987 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात स्मिता पाटील, श्रीराम लागू, रमेश देव, जयश्री गडकर आणि अमरीश पुरी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (Mi Shivajiraje Bhosale Boltoy) : शिवाजी महाराजांचे विचार मध्यमवर्गीय माणसाला कसे मदत करू शकतात हे या चित्रपटात दाखवले आहे. हा चित्रपट 2009 मध्ये प्रदर्शित झाला होता.
फर्जंद(farzand) : फर्जंद सिनेमा दिग्पाल लांजेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता.
फत्तेशिकस्त (Fateshikast) : दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित, ‘फत्तेशिकस्त’ नोव्हेंबर 2019 मध्ये प्रदर्शित झाला.
हिरकणी(hirkani): ‘हिरकणी’ हा चित्रपट 24 ऑक्टोबर 2019 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले असून यात शिवाजी महाराजांची भूमिका देखील प्रसादने साकारली होती.
तान्हाजी: ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर'(Tanhaji: The Unsung Warrior) : या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
पावनखिंड(pavankhind) : स्वराज्याची सेवा, राजांशी निष्ठा, दरोडेखोरांचा नायनाट, दिलेली वचने पूर्ण करणे, हे सारे गुण शिवरायांच्या मावळ्यांच्या रक्तात अक्षरश: भिनले होते. याच पवित्र रक्ताच्या घोडखिंडीचा इतिहास ‘पावनखिंड’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पावनखिंड सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे.
OTT प्लॅटफॉर्मवर क्राइम मालिकांचं वर्चस्व, ‘अनदेखी 2’ सह अनेक क्राईम ड्रामा