Lakshya Lalwani: जाणून घ्या कोण आहे ‘बेधडक’ आणि शनाया कपूरचा हिरो लक्ष्य लालवानी, अनेक टीव्ही शोमध्ये केले आहे काम 

मुंबई : बॉलीवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर पुन्हा एकदा स्टार किडला त्याच्या चित्रपटाद्वारे लॉन्च करणार आहे आणि तो स्टार किड शनाया कपूरला धर्मा प्रोडक्शनच्या नवीन प्रोजेक्ट ‘बेधडक'(Bedhadk)मधून लॉन्च करणार आहे. करण जोहरच्या या चित्रपटात लक्ष्य लालवानी आणि गुरफतेह पिरजादा यांनाही स्थान मिळाले आहे.

चित्रपटातील या तिघांचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला असून प्रत्येकाला त्यांचा लूक आवडला आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रत्येकाला या सेलिब्रिटींबद्दल जाणून घ्यायचे आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे लक्ष्य लालवानी जो शनाया कपूरसोबत रोमान्स करणार आहे आणि  पडद्यावर डेब्यू करणार आहे.

लक्ष्य लालवानी याआधी करण जोहरच्या दोस्ताना चित्रपटाच्या सिक्वेलमधून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार होता. त्यांनी या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवातही केली होती, मात्र सध्या हा चित्रपट बंद आहे. अशा परिस्थितीत आता लक्ष्य ‘बेधडक’मध्ये दिसणार आहे. आपल्या लूकने सर्वांना वेड लावणाऱ्या लक्ष्यने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी टीव्हीच्या दुनियेत काम केले आहे.

अभिनेता लक्ष्य लालवानी याचे टीव्हीशी खूप जुने नाते आहे आणि तो MTV India वर प्रदर्शित झालेल्या ‘वॉरियर हाय’ या शालेय नाटकात दिसला आहे.  यासोबतच अधुरी कहाणी हमारी  आणि भारताच्या वीर योद्ध्यांपैकी एक ‘पोरस’ या शोमध्ये लीड म्हणून काम केले आहे,.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lakshya (@itslakshya)

त्याचवेळी, सोनी एंटरटेनमेंटवर प्रदर्शित झालेल्या या शोमध्ये अभिनेता लक्ष्य लालवाणीने पुरुषोत्तमची भूमिका साकारली होती, लक्ष्य स्टार प्लसवर प्रदर्शित झालेल्या या मालिकेत अर्जुन बिजलानी आणि दृष्टी धामी यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. लक्ष्य सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि चाहत्यांमध्ये तो खूप लोकप्रिय आहे. तो त्याच्या डॅशिंग लूकमध्ये फोटो शेअर करत असतो.

 

 

Social Media