भंडारा : भारतीय सेनेचे सैनिक शहीद जवान संदीप (चंद्रशेखर) रुपचंद भोंडे विरसुपुत्राला काल जम्मु काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यात आर्मीवाहन अपघातात वीरमरण आले.ते भंडारा शहरातील रहिवासी होते. उद्या त्यांच्या पार्थिवावर भंडारा येथे राजकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येतील.
भारतीय सेनेचे सैनिक शहीद जवान संदीप (चंद्रशेखर) रुपचंद जी भोंडे, मूळ गाव डोंगरगाव ता,मोहाडी सध्या वास्तव्य भंडारा यांचे काल जम्मू काश्मीर जिल्ह्यात कर्तव्य बजावताना वीर मरण आले. त्यांचे वडील नुकतेच पोलीस सेवेतून आंधळगाव पोलिस स्टेशनमधून निवृत्त झाले होते.
भंडारा येथील जवानांचा कुपवाडा येथे अपघातात मृत्यू..
जम्मू -काश्मीर मधे कुपवाडा येथे आर्मी वाहनला झालेल्या अपघातात भंडारा जिल्ह्यातील सुपुत्र असलेल्या 36 वर्षीय संदीप उर्फ चंद्रशेखर भोंडे याचे अपघाती निधन झाल्याची दुःखद घटना घडली आहे. संदीप उर्फ्र चंद्रशेखर भोंडे हा भारतीय सैन्य दलात जम्मू काश्मीर येथे कार्यरत होता. काल संदीप हा कर्तव्यावर असतांना जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील मच्छीगण वरुन विलगीकरण केंद्र कडे जात असतांना सरकुल्ली येथे अनियंत्रित गाडीला अपघात झाला. यात संदीप सहित पाच जवान गंभीर जखमी असून त्यांच्या वर 168 मिलिट्री हॉस्पिटल ड्रगमुल्ला येथे उपचार सुरु होता.
दरम्यान उपचारादरम्यान भंडारा शहरातील संदीप भोंडे या जवानाचा उपचारादरम्यान दुदैवी निधन झाले आहे. घरापासून सैन्याचा वारसा लाभलेला संदीप हा 2008 मध्ये 21 महार रेजिमेंट नौकरी लागला. आपली पदोन्नती ची एक-एक पाऊले चढत संदीप झेप घेत होता. दरम्यान 2016 ला संदीप विवाह झाला असून त्याला संदीप चार वर्षाचा मुलगा होता. नुकतीच 75 दिवसाची रजा आटोपून संदीप पाच मार्चला आपल्या कर्तव्य स्थानी गेला होता. तेथून आपल्या पोस्टीग झालेल्या ठिकाणावर जात असतांना वाटेतच जवानांच्या अनियंत्रित वाहनाच झालेल्या अपघातात संदीप चा दुदैवी मृत्यू झाला. संदीप च्या शवविच्छेदनाची परवानगी घेण्यासाठी कुटुंबाला फोन केल्या नंतर संबंधित दु:खद घटना उघड झाली आहे. संदीपचे शव उद्या भंडारा शहरात पोहचणार असुन शासकीय इतमानात अंत्यसंस्कार केले जाणार आहे. संदीप च्या दुर्देवी मृत्युने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. माझा मुलाचा मृत्यू झाला यांचा मला दुःख आहे मात्र तो देशासाठी कार्य करताना शाहिद झाला याचा अभिमान असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले.