नागपुरच्या शासकीय रुग्णालयातील वरिष्ठ डॅाक्टरांनी पुकारला संप…

नागपूर : शासकीय रुग्णालयातील अस्थायी डॉक्टरांना स्थायी करावे, सातवा वेतन आयोगातील वेतन व भत्ते तात्काळ द्यावे अश्या विविध मागण्यांसाठी नागपुरातील मेडिकल, मेयो (Medical, Mayo)मधील वरिष्ठ डॉक्टरांनी संप पुकारला आहे. कालपासून पुकारण्यात आलेल्या या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे.

वरिष्ठ डॉक्टरांचा या संपामुळे शहरातील मेडिकल, मेयो मधील रुग्णसेवा विस्कळीत झाली असून रुग्णांच्या शस्त्रक्रिया थांबल्या आहेत, निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्ड ने सुद्धा वरिष्ठ डॉक्टरांचा या संपाला पाठिंबा दिल्याने शासकीय रुग्णालयातील रुग्णसेवेवर याचा परिणाम पडला आहे.

शासनाने आमच्या मागण्यांकडे तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर्स असोसिएशन चे वरिष्ठ पदाधिकारी डॉ.उदय नागलावार यांनी केली आहे . डॉक्टरांचा संपामुळे ४० टक्के शस्त्रक्रिया कमी झाल्या असून ओपीडी, आयपीडी, शस्त्रक्रियांवर परिणाम झाला आहे , अनेक शस्त्रक्रिया पुढं ढकलण्यात आल्या आहेत .

Social Media