मुख्यमंत्र्यांनी फिरण्याबरोबरच जनतेची सुख-दु:खेही निवारण करावीत : विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

मुंबई : महाराष्ट्रातील जनतेला मुख्यमंत्री दोन-अडीच वर्षांत जवळून पाहायला मिळतील, यापेक्षा आनंद दुसरा काय असू शकतो? मुख्यमंत्री मंत्रालयात दोन-अडीच वर्षे जरी बसले असते, राज्यकारभार केला असता, तरी त्यांना फिरायची आवश्यकता नव्हती. मुख्यमंत्री फिरतील, दिसतील, बघतील तर जनता खुश होईल आणि फिरण्याबरोबरच त्यांनी जनतेची सुख-दु:खेही निवारण करावीत, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी लगावला.

आजच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसात मी राज्याच्या कानाकोपऱ्यात असेन, असे वक्तव्य केले आहे. त्यावर विरोधी पक्षनेते दरेकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात सक्रिय सहभाग घेतला असता, राज्यातील जनतेला बजेटच्या माध्यमातून काही दिले असते, तरी फिरायची आवश्यकता नव्हती

शिवसेनेने आत्मपरीक्षण केले पाहिजे. राणा भीमदेव थाटामद्धे तिकडे जाऊन सभा घेतल्या. आम्ही भाजपला चारी मुंडया चीत करू, पण त्यांना नोटापेक्षा कमी मते मिळाली. आपला एवढी मते मिळाली, असे ते राऊत म्हणाले. दुसऱ्याला काय मिळाले? यापेक्षा स्वतःला काय मिळाले हे आधी सांगा. आपली दाणादाण, धूळधाण झालीय. जानकर साहेबांचा राष्ट्रीय समाज पक्ष आहे, त्याला शिवसेना आणि राष्ट्रवादीपेक्षा उत्तर प्रदेशमध्ये जास्त मते मिळलीयत. दुसऱ्यांच्या आनंदात सुखी राहणार असाल आणि शिवसेनेच्या काऊंटडावूनची काळजी नसेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे.

पण जनता पूर्णपणे अस्वस्थ आहे. सारकरवर प्रचंड नाराज आहे. या सगळ्यासाठी आता त्यांना फिरण्यावचून गत्यंतर नाही. म्हणून अशा प्रकारच्या मोहिमेअंतर्गत ते जाणार असतील, तर त्यांचे स्वागतच आहे. मुख्यमंत्री फिरतील, दिसतील, बघतील तर जनता खुश होईल आणि फिरण्याबरोबरच त्यांनी जनतेची सुख-दु:खेही निवारण करावीत, असेही दरेकर यांनी सांगितले.


नेतृत्वाची जबाबदारी घेण्यास महिला सक्षम : जिल्हाधिकारी आर विमला

Social Media