मुंबई : चित्रपटगृहांमध्ये सर्वाधिक प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या ‘द काश्मीर फाइल्स'(The Kashmir Files) या चित्रपटाने 9व्या दिवशीही कमाई सुरू ठेवली आहे. काश्मिरी पंडितांच्या हत्याकांड आणि पलायनाच्या मुद्द्यावर बनलेला हा चित्रपट लवकरच 150 कोटी रुपये कमवू शकतो. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित, ‘द काश्मीर फाइल्स’ लोकांच्या हृदयाला स्पर्श करण्यात यशस्वी ठरला, म्हणूनच या चित्रपटाने आतापर्यंत त्याच्या बजेटपेक्षा कितीतरी पटीने अधिक कमाई केली आहे.
या चित्रपटाने आता बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला आहे, ‘द काश्मीर फाइल्स’ने आतापर्यंत एकूण 141.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमार स्टारर ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाला या चित्रपटातून तगडी स्पर्धा पाहायला मिळत आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ 11 मार्चला रिलीज झाला पण चित्रपटगृहांमध्ये अजूनही चांगली कमाई करत आहे. चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर पहिल्या दिवशी केवळ 3.55 कोटींची कमाई झाली, त्यानंतर कलेक्शनमध्ये तेजी आली. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण 141.25 कोटींची कमाई केली असून लवकरच तो 150 कोटींचा आकडाही ओलांडू शकतो.
प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विट केले की, ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files)प्रमाणेच 1975 मध्ये आलेल्या ‘जय संतोषी मां’ या चित्रपटानेही कमाईच्या बाबतीत विक्रम केला होता, मात्र त्या काळात ‘शोले’ने सर्व चित्रपटांना मागे टाकले होते. तरण आदर्श म्हणाले की, बॉक्स ऑफिसवर 47 वर्षांनंतर जेव्हा एखाद्या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत इतिहास रचला तेव्हा पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट सतत नवे मापदंड प्रस्थापित करत आहे.
काश्मीर फाइलमध्ये निर्मात्यांनी 1990 मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार यांसारख्या अनुभवी कलाकारांनी आपापली भूमिका चोख बजावली आहे.
RRR: चित्रपटगृहांमध्ये ‘RRR’ रिलीज झाल्यानंतर 10 दिवस तिकिटे महागतील