Summer foods for skin : उन्हाळ्यात त्वचेतील ओलावा टिकवण्यासाठी घ्या ‘या’ गोष्टी 

Summer foods for skin :सतत वाढत जाणारी उष्णता, उकाळा, प्रखर सूर्यप्रकाश आरोग्यालाच नाही तर त्वचेलाही हानी पोहोचवू शकतो. जर तुम्ही बाहेर गेलात तर तुम्हाला तुमच्या त्वचेची जास्त काळजी घ्यावी लागेल. कारण कडक उन्हात त्वचा टॅन होऊ शकते. चेहऱ्यावर उष्णतेमुळे घाम येतो, ज्यामुळे पिंपल्सची समस्या उद्भवू शकते. उन्हापासून बचाव करण्यासाठी आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही उन्हाळ्यातील काही खास पदार्थांचा आहारात समावेश करू शकता.

उन्हाळ्यात त्वचेचा कोरडेपणा आणि निस्तेजपणा टाळण्यासाठी आपल्यापैकी बहुतेक लोक बाजारात उपलब्ध असलेल्या लोशन आणि क्रीम्सचा वापर करतात. परंतु या गोष्टी त्वचेचे बाहेरून संरक्षण करू शकतात, तुमची त्वचा आतून निरोगी ठेवण्यासाठी या गोष्टींचे सेवन करावे. हेही वाचा-Beauty Tips…जाणून घ्या सहा आयुर्वेदिक सौंदर्य टिप्स ज्या वर्षभर तुमच्या त्वचेचे रक्षण करतील!

त्वचेचा कोरडेपणा टाळण्यासाठी खा हे पदार्थ :

 टरबूज-(Watermelon)

टरबूज हे उन्हाळ्यात आढळणारे हंगामी फळ आहे. टरबूज हा पाण्याचा उत्तम स्रोत मानला जातो. दररोज टरबूजाचे सेवन केल्याने तुम्ही त्वचा आणि शरीर दोन्ही निरोगी ठेवू शकता.

काकडी-(Cucumber)

उन्हाळ्यात काकडी  खूप आवडीने खाल्ली जाते. त्यात जवळपास 95 टक्के पाणी आढळते. काकडीत आढळणारे पोषक घटक त्वचा निरोगी ठेवण्यास आणि कोरडेपणा दूर करण्यास मदत करतात.

नारळ पाणी-(Coconut water)

नारळाच्या पाण्याच्या सेवनाने संपूर्ण शरीर निरोगी ठेवता येते. नारळाच्या पाण्यात आढळणारे पोषक तत्व शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवण्यास आणि त्वचा चमकदार आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात.


Beauty Tips : तुम्हाला मेकअपशिवाय सुंदर दिसायचंय? मग आजच फॉलो करा या ब्यूटी टिप्स

Beauty Tips : कांद्याचा रस केसांच्या समस्येसाठी रामबाण उपाय, कसे वापरावे ते जाणून घ्या?

Drinks for the skin: हिवाळ्यात त्वचा निरोगी ठेवण्यासाठी या तीन पेयांचे सेवन करा

Social Media