RRR Box Office Collection : RRR चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, 700 कोटींचा टप्पा पार

मुंबई : एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटाने थिएटरमध्ये 1 आठवडा पूर्ण केला आहे आणि चित्रपट जगभर धमाल करत आहे. राम चरण(Ram Charan) जूनियर एनटीआर(Jr. NTR) स्टारर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक धमाकेदार रेकॉर्ड तोडले आहेत. अवघ्या सात दिवसांत, चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 700 कोटी (RRR Box Office 700 crore) चा टप्पा ओलांडला आहे.

त्याचबरोबर या चित्रपटाची दौड अजूनही पूर्ण ताकदीने सुरू आहे. व्यापार अहवालांनुसार, RRR ने सातव्या दिवशी जगभरात 50 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे आणि ती 700 कोटींवर पोहोचली आहे.

एसएस राजामौली (SS Rajamouli)यांचा हा चित्रपट लवकरच 700 कोटींचा टप्पा पार करू शकतो, असे बोलले जात आहे. सहाव्या दिवशी जगभरात 672 कोटींची कमाई केल्यानंतर आता राजामौलीच्या या चित्रपटाने बाहुबली द बिगिनिंगचा(Bahubali The Beginning) रेकॉर्ड मोडला आहे. बाहुबलीने एकूण 650 कोटींची कमाई केली होती पण आता RRR ने त्याचा रेकॉर्ड मोडला आहे आणि आता तो 700 कोटींचा टप्पा देखील पार करू शकतो.

RRR हा 550 कोटींचा बिग बजेट बनलेला चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटाला सुपरहिटच्या श्रेणीत येण्यासाठी 800-850 कोटींचा टप्पा पार करावा लागेल, हा चित्रपटासाठी सोपा मार्ग असल्याचे दिसते. RRR प्रेक्षक या चित्रपटाचे कौतुक करत आहेत आणि त्याला मनोरंजक आणि भव्य म्हणत आहेत. त्यामुळेच आठवड्याच्या दिवसातही चित्रपटाची कमाई फारशी कमी होत नाहीये.


शेजाऱ्याविरुद्ध सलमान खानचा मानहानीचा खटला, मुंबई कोर्टाने फेटाळला?

फराह खान अलीने उर्फी जावेदला दिला बरे कपडे घालण्याचा  ‘सल्ला’, मिळाले सडेतोड उत्तर

काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींविरोधात वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार

Social Media