बाबासाहेब सहस्त्रबुद्धे स्मृती शिक्षण प्रबोधिनी पुरस्कारासाठी डॉ. आरती सावजी यांची निवड

नागपूर : सर्वोदय आश्रम नागपूरच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या कै. मामा क्षीरसागर स्मृती आचार्य पुरस्कारासाठी कै. दि.ह. उपाख्य बाबासाहेब सहस्त्रबुद्धे स्मृती शिक्षण प्रबोधिनी पुरस्कारासाठी सर्वोदय आश्रमाने नियुक्त केलेल्या निवड समितीने  डॉ. आरती सावजी,नागपूर यांची निवड केली आहे.

रुपये 5000 रोख, शॉल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार वितरण समारंभ बुधवार दिनांक 6 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सर्वोदय आश्रम धरमपेठ नागपूर येथे संपन्न होणार आहे.

Social Media