RRR Box Office Collection: RRR सर्वाधिक कलेक्शन करणारा भारतीय चित्रपट ठरला, 9व्या दिवशी मोडले अनेक विक्रम 

मुंबई : सुपरस्टार ज्युनियर एनटीआर (Jr. NTR) आणि राम चरण(Ram Charan) यांचा चित्रपट आरआरआर (RRR)जगभरातील चित्रपटगृहांमध्ये भरपूर कमाई करत आहे. एसएस राजामौली(SS Rajamouli) दिग्दर्शित आरआरआर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.

जगभरात, RRR चित्रपटाने 800 कोटींहून अधिक कमाई करून नवा विक्रम केला आहे. ट्रेड तज्ज्ञ मनोबाला विजयबालन यांनी खुलासा केला की, पॅन इंडियन चित्रपट 9 व्या दिवशी आतापर्यंतचा सहावा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे.

मनोबालाने ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘RRR बॉक्स ऑफिसवर 819.06 रुपयांची कमाई करून आतापर्यंतचा 6वा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. RRRला जगात जितके प्रेम मिळत आहे तितकेच प्रेम भारतातही मिळत आहे. या चित्रपटात बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट(Alia Bhatt) आणि अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn)देखील छोट्या भूमिकेत  आहेत. ज्युनियर एनटीआर आणि राम चरणची जोडी चाहत्यांना खूप आवडते आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वीकेंडमध्ये चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी उसळी होती. यासोबतच गुढीपाडव्याच्या उत्सवामुळे आरआरआरची कमाई वाढण्यास मदत झाली. मागील दिवसांच्या तुलनेत 9व्या दिवशी चित्रपटाच्या तिकीट बुकिंगमध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. अल्लुरी सीताराम राजूच्या भूमिकेतील राम चरण आणि कोमाराम भीमच्या भूमिकेत ज्युनियर एनटीआरचा अभिनयही हिंदी पट्ट्यातील प्रेक्षकांना आवडला आहे.


RRR Box Office Collection : RRR चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, 700 कोटींचा टप्पा पार

 


शेजाऱ्याविरुद्ध सलमान खानचा मानहानीचा खटला, मुंबई कोर्टाने फेटाळला?

Social Media