मुंबई : प्रकाशनच्या शताब्दी वर्षात पदार्पण करीत असलेल्या रत्नागिरी येथील साप्ताहिक बलवंतच्या नव्या रूपातील तसेच डिजिटल आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी (दि.७ ) राजभवन येथे झाले.
कार्यक्रमाला आमदार आशिष शेलार, साप्ताहिक बलवंतचे संपादक व माजी आमदार सुरेंद्रनाथ (बाळ) माने, मालक श्रीमती माधवी माने, ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक, किशोर आपटे व इतर मान्यवर उपस्थित होते.
माध्यम क्षेत्रातील क्रांतीमुळे साप्ताहिके बंद होत असताना साप्ताहिक बलवंत स्थापनेची शताब्दी साजरी करीत आहे तसेच ते नव्या व डिजिटल रूपात वाचकांपुढे येत असल्याबद्दल आनंद व्यक्त करताना राज्यपालांनी बाळ माने व माधवी माने यांचे अभिनंदन केले.
साप्ताहिक बलवंत स्वातंत्र्य पूर्व काळात सुरु झाले. त्याकाळात देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी काम करणे जोखीमीचे होते. हे कार्य निष्ठेने केल्याबद्दल राज्यपालांनी संस्थापकांप्रती गौरवोद्गार काढले.
एखादे साप्ताहिक ठराविक विचार धारेचे असले तरीही ते एकांगी होऊ नये. साप्ताहिकाने आपला नि:पक्षपातीपणा कायम ठेवल्यास लोक त्याचा आदर करतील असे राज्यपालांनी सांगितले.
बलवंतची स्थापना १९ ऑक्टोबर १९२३ रोजी विजया दशमीच्या दिवशी झाली होती. कै .गजानन पटवर्धन यांनी स्वातंत्र्य जागृतीसाठी लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेतून बलवंत साप्ताहिकाची सुरुवात केली होती असे बाळ माने यांनी सांगितले.
Governor Koshyari releases new look weekly ‘Balwant’
Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari released the new look and the digital edition of the centenarian weekly magazine ‘Balwant’ at Raj Bhavan Mumbai on Thursday (7 April).
MLA Ashish Shelar, editor and former MLA Surendranath (Bal) Mane, owner Madhvi Mane, senior journalists Avinash Pathak and Kishore Apte were among those present.
Weekly Balwant started in the year 1923 by late Gajanan Patwardhan is entering into its centenary year in 2022-2023.
इंडोनेशिया येथील कर्करोग रुग्ण दिशादर्शकांना (नेव्हिगेटर्स) टाटा मेमोरिअल सेंटर करणार प्रशिक्षित
52 हजार वर्षांपूर्वी उल्का पडून तयार झाला ‘हा’ सुंदर तलाव, आता दूरदूरवरून येतात पर्यटक
World Health Day 2022: जागतिक आरोग्य दिन? जाणून घ्या काय आहे यंदाची थीम