नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी कार्ड फसवणूक रोखण्यासाठी पावले उचलण्याची घोषणा केली. या अंतर्गत, रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना एटीएममधून कार्डलेस पैसे काढण्याची सुविधा सुरू करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या एटीएममधून कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा देशातील काही बँकांकडूनच दिली जात आहे. ही सुविधा देखील ग्राहकांना तेव्हाच मिळते जेव्हा ते संबंधित बँकेचे एटीएम वापरतात.
द्वि-मासिक चलनविषयक धोरण पुनरावलोकनाची घोषणा करताना, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास (Reserve Bank Governor Shaktikanta Das)म्हणाले, “आता UPI वापरून सर्व बँका आणि एटीएम नेटवर्कवर कार्डलेस रोख पैसे काढण्याची सुविधा प्रदान करण्याचा प्रस्ताव आहे. त्याचा वापर करून व्यवहार करणे सोपे जाईल. यासोबतच कार्डलेस कॅश काढण्याच्या सुविधेमुळे कार्ड स्किमिंग, कार्ड क्लोनिंग यांसारख्या फसवणुकीला आळा बसेल.
यासंदर्भात एनपीसीआय, एटीएम नेटवर्क आणि बँकांना लवकरच स्वतंत्र सूचना जारी केल्या जातील.
विकास आणि नियामक धोरणांवरील निवेदनात म्हटले आहे की युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वापरून ग्राहकांची ओळख पटवली जाईल तर अशा व्यवहारांचे सेटलमेंट एटीएम नेटवर्कद्वारे केले जाईल.
भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS) च्या संदर्भात, ते म्हणाले, बिल पेमेंट इतर उत्पादने किंवा सिस्टमसह कार्य करण्यासाठी हे एक ‘इंटरऑपरेबल’ व्यासपीठ आहे. यामध्ये गेल्या काही वर्षांत बिल भरणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
Rise in Paytm share price: पेटीएमचे शेअर्स ३ आठवड्यांच्या उच्चांकावर
7th Pay Commission: या राज्यातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ