मुंबई : प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट 15 एप्रिल रोजी विवाहबंधनात अडकले. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आणि अतिशय साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांनी आलिया आणि रणबीरला अनेक भेटवस्तू दिल्या. यापैकी आलियाची आई सोनी राजदान हिने रणबीरला दिलेल्या गिफ्टने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
रिपोर्ट्सनुसार, आलियाच्या आईने रणबीरला 2.50 कोटी रुपयांचे घड्याळ गिफ्ट केले होते. आलिया भट्टने पाहुण्यांना काश्मिरी शाल दिली. रिपोर्ट्सनुसार, रणबीरचे बूट लपवणाऱ्या आलीयाच्या मित्र आणि बहिणींनी रणबीरकडे 11.5 कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र रणबीरने त्यांना एक लाख रुपये दिले.
लग्नसोहळ्यानंतर आलियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. आलियाने पोस्टला कॅप्शन दिले, “आम्ही कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. आमच्या आयुष्यातील या खास दिवशी प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल धन्यवाद.”
आलिया आणि रणबीरचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. आलिया आणि रणबीर कपूरसोबत या चित्रपटात बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन देखील मुख्य भूमिकेत असणार आहेत. तसेच या चित्रपटात मौनी रॉय आणि नागार्जुन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी रिलीज होणार आहे.
दिग्दर्शक जयंत गिलाटर यांच्या आगामी ‘विठ्ठल विठ्ठला’ चित्रपटात डॉ अमोल कोल्हे…
‘वरमाला सेरेमनी’मध्ये आलियासाठी तिचा ‘सावरिया’ आला गुडघ्यावर…