संतनगरी शेगाव येथे भाट समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न

शेगाव : अखिल महाराष्ट्र भाट समाज चे वतीने संतनगरी शेगाव येथे भाट समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन नुकतेच संपन्न झाले.
दिनांक २३ एप्रील २०२२ रोजी सायंकाळी ७ वाजता अधिवेशनाचे निमित्ताने शेगाव येथे आलेल्या सर्व महिलांचा परिचय मेळावा व हळदी-कुंकु कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात दिडशे पेक्षा जास्त महीला सहभागी झाल्या होत्या यावेळी महीलांनी एकमेकींचा परीचय घेऊन त्यांच्या कलागुणांना वाव देत काव्य व गीत सादर केले या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मेघाताई भोंडे नागपूर यांनी केले . त्याच वेळी महाराष्ट्रातील विविध जिल्हातुन शेगाव येथे आलेल्या जिल्हा संघटन पदाधिकार्यांसोबत राज्य संघटन ची संयुक्त बैठक पार पडली या बैठकीत राज्य अध्यक्ष विनायकराव सुर्यवंशी व राज्य महासचिव अरविंद शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

रविवार दिनांक २४ एप्रील रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.३० पर्यत दोन सत्रात अधिवेशन पार पडले सदर अधिवेशनाचे प्रमुख अतिथी म्हणुन दादासाहेब इदाते , अध्यक्ष ,विमुक्त-घुमन्तु जनजाती विकास बोर्ड , नवी दिल्ली उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरूवात दिप प्रज्वलन व विद्येची देवी सरस्वती तसेच वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पन करून झाली. तद्नंतर स्नेहल प्रमोद बाविस्कर हिने सरस्वती स्तवन सादर केले.

भाट-समाजाचे-राज्यस्तरीय-अधिवेशन
संतनगरी शेगाव येथे भाट समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न

तद्नंतर सर्व मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडला.यावेळी राज्य संघटनचे वतीने श्री.दादासाहेब इदाते यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यावेळी भाट समाजाचा भटक्या विमुक्त जातीत (VJNT) समावेश व्हावा असे निवेदन देण्यात आले.
सदर अधिवेशन बुलढाणा जिल्हात असल्याने स्वागत समितीचा मान बुलढाणा जिल्हा संघटन यांना दिला होता. सदर समीतीचे स्वागताध्यक्ष योगेश नवले यांनी राज्य अध्यक्ष विनायकराव सुर्यवंशी व बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विशाल नवले यांनी राज्य महासचिव अरविंद शिंदे यांचा सत्कार केला तसेच दिपक साळवी राज्य संघटक ,उपाध्यक्ष केशवराव दशमुखे ,  जनार्दन परिहार ,राज्य सचिव अप्पाजी बाविस्कर, संजय भाट , राहुल चोपडे तसेच राष्ट्रीय पदाधिकारी सुधिर भाट व सुनिल सुर्यवंशी यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.अधिवेशन नियोजनासाठी गठीत समिती सदस्य अभिजीत भाट ,  मधुकर पुजारी, उमेश खंडारे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला तसेच अधिवेशनासाठी वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची स्वता रेखाटलेली मोठी प्रतीमा उपलब्ध करून देणारे विलास शिंदे पेंटर व माजी उपाध्यक्षा सुशिलाताई लाडसे नागपुर यांचाही सत्कार मुख्य अतिथी यांचे हस्ते करण्यात आले,

सत्कार समारंभानंतर राज्य महासचिव अरविंद शिंदे यांनी प्रास्ताविक भाषनात प्रामुख्याने भाट समाजाचे एकत्रीकरण व यामागचा उद्देश , समाजातील युवा-युवतीनी प्रत्येक क्षेत्रात पुढे येण्याची गरज तसेच भाट समाज एक आदर्श समाज म्हणुन नावरूपास यावा असे मत व्यक्त करत सदैव राज्य संघटन समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहनार असल्याचा विश्वास दिला. समाज शैक्षणिक , सामाजिक , व्यवसायीक व आर्थीक दृष्टीने पुढे यावा यासाठी संघटीत होण्याची गरज असल्याचे मत यावेळी अरविंद शिंदे यांनी व्यक्त केले.

भाट-समाजाचे-राज्यस्तरीय-अधिवेशन
भाट-समाजाचे-राज्यस्तरीय-अधिवेशन

अधिवेशनाचे प्रमुख अतिथी दादासाहेब इदाते यांनी भाट समाज इतीहासात प्रमुख योगदान देणारा समाज होता.हा वंशावळ लेखनासाठी सदैव भटकंती करणारा समाज असुन हा समाज घुमन्तु जाती प्रवर्गात येत असल्याने त्यांचेकडुन समाजास योग्य न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार असल्याचा विश्वास दिला यावेळी प्रमुख अतिथी यांचे हस्ते पुस्तक रूपात व डीजीटल स्वरूपात स्मरणिका प्रकाशित करण्यात आली.

राज्य अध्यक्ष विनायकराव सुर्यवंशी यांनी भाट समाजाचे जिवनमान , व्यवसाय व परांपरा बघता हा समाज भटक्या-विमुक्त जातीमध्येच असणे गरजेचे होते मात्र हा समाज शासन दरबारी सदैव उपेक्षित राहीला मात्र आता हा समाज संघटीत होत असुन या समाजास योग्य न्याय मिळवुन द्यावा असे विविध उदाहरनासह प्रमुख अतिथी दादासाहेब इदाते यांना विनंतीवजा निवेदन केले.

भोजन मध्यांतरानंतर आपल्या समाजातील युवा सप्तखंजेरी वादक तुषारदादा सुर्यवंशी , नागपुर यांनी समाज प्रबोधनपर सांगीतीक कार्यक्रम सादर केला या कार्यक्रमातुन त्यांनीही समाजास अंधश्रद्धा निर्मुलन , विवाह सोहळ्यावरील अनावश्यक खर्च , युवकांनी प्रशासकीय सेवेत यावे अशा अनेक सामाजिक विषयावर प्रकाश टाकीत उपस्थीत समाजबांधवांना मंत्रमुग्ध केले ,यावेळी तुषारदादांचा समाजातर्फे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात त्यांचे वडील व मोठे बंधु नितीन सुर्यवंशी व इतर टीम ने साथ दिली ,यानंतर मधुरा नितीन महादाने हिने अतिशय सुंदर व सुरेल असे सांगीतीक गीत रामायण सादर केले.

संतनगरी-शेगाव
भाट-समाजाचे-राज्यस्तरीय-अधिवेशन

अधिवेशनाच्या द्वितीय सत्रात सर्व जिल्हा संघटन अध्यक्ष /उपाध्यक्ष यांना व्यासपीठावर आमंत्रीत करून त्यांचा राज्य संघटन चे वतीने सत्कार करण्यात आला तसेच यावेळी सुनिल सुर्यवंशी ,सचिव नागपुर जिल्हा तथा राष्ट्रीय सदस्य , सुधिर भाट संघटक कोल्हापूर जिल्हा तथा राष्ट्रीय सदस्य , अप्पाजी बाविस्कर अध्यक्ष चंद्रपुर तथा राज्य उपाध्यक्ष , अर्जुन पाचारणे अध्यक्ष मुंबई , विशाल नवले अध्यक्ष बुलढाणा , गंगाधर चकोर अध्यक्ष वर्धा यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.यावेळी व्यासपीठावर मधूकर पुजारी, जयवंत पवार, गजाननजी जगताप , अरविंद काकडे , सुनिल शिरसाट उपस्थित होते. कार्यक्रमाचे शेवटी  दिपक साळवी , राज्य संघटक यांनी राज्य कार्यकारणी रचना , अधिवेशनाचे नियोजन व विविध कार्यक्रम यावर आपले सविस्तर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार  योगेश नवले , सदस्य आरक्षण अभ्यासगट समिती तथा स्वागताध्यक्ष यांनी केले तर अधिवेशनाचा शेवट कु.स्नेहल बाविस्कर यांनी सुमधुर आवाजात वंदनिय रा.तुकडोजी महाराज रचित राष्ट्र वंदना द्वारे करण्यात आला.

सदर अधिवेशनाला महाराष्ट्रातील एकूण पंधरा जिल्हातील ४५० हुन अधिक महीला-पुरूष समाजबांधव व भगीनी उपस्थित होते. यावेळी सभागृहात वंशावळ लेखक अर्जुनजी नवले यांनी वंशावळ पुस्तीकेसह उपस्थीत राहुन सविस्तर माहीती दिली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रातील भंडारा , गडचिरोली, चंद्रपुर, नागपुर, वर्धा, अकोला , बुलढाणा , जळगाव , जालना , कोल्हापुर , ठाणे-पालघर जिल्हा संघटन पदाधिकारी तसेच सभागृहातील व्यवस्थापन पुढील समाजबांधव – भगीनी यांनी केले.

महिला परिचय मेळावा व हळदी-कुंकु समारंभ व्यवस्थापन

सौ.संगीता अ.शिंदे मुंबई
सौ,मेघाताई भोंडे नागपूर
सौ.शारदा सु.सुर्यवंशी नागपूर
सौ.ज्योती निचळ नागपूर
सौ.राणीताई मोरे नागपूर
सौ.सीमाताई चव्हाण नागपूर
कु.शितल खोडकर नागपूर
कु.ग्रंथाली खंडारे मुंबई.

दिप प्रज्वलन व उद्घाटन व्यवस्थापन

श्री.विलास शिंदे पेंटर नागपुर
सौ.अर्चनाताई साळवी मुंबई
कु. रीतीका गायकवाड मुंबई

नोंदणी व्यवस्थापन

श्री.विजयजी खडतकर नागपुर
श्री.कीशोरजी लाडकर नागपूर
कु.अश्वीनी अ.काकडे भंडारा
चैतन्य र. शिंदे मुंबई

नास्ता व भोजन व्यवस्थापन

संदीप राऊत नागपूर
अंकीत जगताप नागपूर
सचिन चोपडे नांदुरा

स्वागत -सत्कार व्यवस्थापन
अथर्व मधुकर पुजारी मुंबई
कु.स्नेहल प्रमोद बाविस्कर चंद्रपुर
कु.शर्वरी सुनील सुर्यवंशी

व्यासपीठ व्यवस्थापन
श्री.सुनिल सुर्यवंशी नागपुर
श्री.राहुल चोपडे नांदुरा
श्री.मधुकर पुजारी मुंबई
श्री.संजय भाट मुंबई
श्री.सतीश मांढरेकर ठाणे

आर्थिक व्यवस्थापन
श्री.उमेश खंडारे मुंबई
श्री.अभिजीत भाट मुंबई

सुत्रसंचालन
श्री.संतोष शिंदे मुंबई
श्री.योगेश नवले नांदुरा
सौ.मेघाताई भोंडे नागपूर

 

Social Media