Heat Wave : विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यात सध्या उष्णतेची तीव्रता वाढत आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडत आहे. तसेच हवामान खात्याने विदर्भात उष्णतेच्या लाटेचा(heat wave) इशारा दिला आहे. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अकोला आणि यवतमाळ या विदर्भातील पाच जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने  29  आणि 30 एप्रिल साठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आज आणि उद्या विदर्भात उष्णतेची लाट राहणार असल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

एप्रिल महिना उन्हाळ्याचे सर्व विक्रम मोडीत निघताना दिसत आहे. अनेक ठिकाणी पारा ४६ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. पुढील चार दिवस उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच यावर्षी एप्रिल महिना उकाड्याचे देशातील सर्व विक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे. एप्रिल महिना भारतातील सर्वात उष्ण एप्रिल असणार आहे. एप्रिलमध्ये तापमान वाढते, जे साधारणपणे मे च्या मध्यानंतर सारखेच राहते.

विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर आणि कोकणातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात गडगडाट होत आहे. दरम्यान, देशातील बहुतांश राज्यांसह जवळपास अर्ध्या भारतामध्ये पुढील तीन ते चार दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. या महिन्यातील तिसऱ्या उष्णतेच्या लाटेने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि मुंबई उपनगरांसह नंतर विदर्भ आणि त्यानंतर कोकण भागाला तडाखा दिला आहे.

दरम्यान, राज्यातील अनेक भागात तापमान 40 अंशाच्या पुढे गेला आहे. मुंबईजवळील काही भागात आणि ठाणे जिल्ह्यात विदर्भाप्रमाणे किमान तापमान ४३ ते ४४ अंशांवर पोहोचले आहे. संपूर्ण एप्रिल महिना गरम होता, आता महिनाअखेरीसही उकाडा जाणवत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यातील तापमान सरासरीपेक्षा जास्त आहे. या महिन्यात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेची लाट(heat wave) आली आणि गेली.मुंबई आणि उपनगरात एप्रिलच्या अखेरीस उष्णतेची लाट आली.


संतनगरी शेगाव येथे भाट समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न

उमरेड रोडवरील सूत गिरणीच्या भूखंडावर जंगलासारख्या भागात वणवा

‘गाव तिथे काँग्रेस’ संकल्प राबवण्यासाठी संघटना मजबूत करा.

Social Media