Akshayya Tritiya 2022: अक्षय्य तृतीया आणि परशुराम जयंती ; जाणून घ्या माहिती…

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी परशुराम जयंती(Parshuram Jayanti) साजरी केली जाते, भगवान विष्णूने आपला सहावा अवतार परशुरामांच्या रूपात घेतला होता. पुराणानुसार महर्षी जमदग्नी ने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला होता आणि नंतर देवराज इंद्राला प्रसन्न करून त्यांना पुत्रप्राप्तीचे वरदान मिळाले. महर्षीं यांच्या पत्नी रेणुका यांनी वैशाख शुक्ल तृतीयेला परशुराम यांना जन्म दिला होता, यावर्षी परशुराम जयंती 3 मे रोजी साजरी होत आहे.

‘अक्षय्य तृतीया’(Akshayya Tritiya ) ही हिंदू धर्मात अत्यंत शुभ तिथी मानली जाते. ‘अक्षय्य तृतीया’ साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे म्हणजेच या तिथीला कोणतेही शुभ कार्य मुहूर्त न पाहता करता येते. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जातो. यावेळी हा उत्सव 3 मे 2022 रोजी आहे. अक्षय्य तृतीयेला आखा तीज असेही म्हणतात.

अक्षय म्हणजे ‘जिचा कधीही क्षय होत नाही म्हणजेच कधीही नाश पावत नाही’. अक्षय्य तृतीयेला सोन्याचे दागिने खरेदी करण्याची विशेष परंपरा आहे. असे मानले जाते की अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जर एखाद्या व्यक्तीने सोने खरेदी केले तर माता लक्ष्मीची कृपा त्याच्या आयुष्यात कायम राहते तसेच व्यक्तीचे जीवन आनंदात आणि वैभवात जाते.
दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या सणाची आतुरतेने वाट पाहिली जाते. यावर्षी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अनेक दुर्मिळ योग तयार होणार आहेत. अक्षय्य तृतीयेला किती वर्षांनी कोणता शुभ योग बनणार आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया.

Akshayya Tritiya 2022:50 वर्षांनंतर ग्रहांचा विशेष संयोग

सर्व तिथींमध्ये वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया ही विशेष तिथी मानली जाते. शास्त्रात अक्षय्य तृतीयेला खास मुहूर्त म्हटले आहे. या विशेष दिवशी शुभ कार्य करणे, शुभ खरेदी करणे आणि दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेला केलेले शुभ कार्य नेहमीच सफल होते, असे मानले जाते.

यावेळी अक्षय्य तृतीयेचा सण रोहिणी नक्षत्र आणि शोभन योगात साजरा होणार आहे. याशिवाय मंगळवार आणि रोहिणी नक्षत्राच्या संयोगाने मंगळ रोहिणी योग तयार होणार आहे. त्याच वेळी, या अक्षय्य तृतीयेला दोन प्रमुख ग्रह आपापल्या राशीमध्ये आणि दोन ग्रह त्यांच्या उच्च राशीमध्ये राहतील. असा योगायोग 50 वर्षांनंतर घडणार आहे.

03 मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चंद्र त्याच्या उच्च राशीत म्हणजेच वृषभ राशीत असेल सुख आणि वैभव प्रदान करणारा शुक्र ग्रह मीन राशीत असेल. याशिवाय शनिदेव स्वतःच्या कुंभ राशीत विराजमान असतील आणि नेहमी शुभ फळ देणारे देवगुरु बृहस्पती मीन राशीत विराजमान असतील. ज्योतिषांच्या मते, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी हे चार मोठे ग्रह अनुकूल स्थितीत असल्यामुळे अक्षय्य तृतीयेचे महत्त्व खूप वाढले आहे. असा शुभ मुहूर्त आणि शुभ संयोग करून अक्षय्य तृतीयेला शुभ खरेदी करून माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूची पूजा केल्यास विशेष फल प्राप्ती होते.


Ram Navami 2022 : या शुभ मुहूर्तावर करा रामनवमीची पूजा, जाणून घ्या पूजेची पद्धत आणि महत्त्व

गुढीपाडवा : समृद्धीची गुढी उभारण्याचे महत्व…

चिमूरचे, श्रीहरी बालाजी…

Social Media