मुंबई : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर(Anurag Thakur) यांनी आज घोषणा केली की फ्रान्समधील 75व्या कान्स चित्रपट महोत्सवासोबत आयोजित होणाऱ्या आगामी मार्शे डू फिल्ममध्ये(Marché du Film) भारत हा अधिकृत सन्माननीय देश असेल. या निर्णयाचे स्पष्टीकरण देताना मंत्री म्हणाले, ” मार्शे डू फिल्ममध्ये अधिकृत सन्माननीय देश असण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि भविष्यातील महोत्सवात विशेष कामगिरी करणाऱ्या देशांना सन्मानित करण्याची प्रथा दरवर्षी चालू राहील.” विशेष म्हणजे फ्रान्स आणि भारत यांच्या राजनैतिक संबंधांना 75 वर्षे पूर्ण होत आहेत, पंतप्रधानांची पॅरिसला भेट आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची भेट या संदर्भात अधिक महत्त्वाची आहे. या महत्त्वाच्या राजनैतिक पार्श्वभूमीवरच कान्स चित्रपट महोत्सवात(Cannes Film Festival) मार्शे डू फिल्ममध्ये भारताची ‘सन्माननीय देश’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
या घोषणेची सविस्तर माहिती देताना ठाकूर म्हणाले की, सन्माननीय देश या दर्जामुळे भारत, त्याचे चित्रपट, त्याची संस्कृती आणि वारसा यावर प्रकाश टाकून मॅजेस्टिक बीचवर आयोजित मार्शे डू फिल्म्सच्या उदघाटन रजनी कार्यक्रमात उल्लेखनीय देश म्हणून भारताची उपस्थिती सुनिश्चित झाली आहे. लोकसंगीत आणि फटाक्यांच्या आतषबाजीसह भारतीय गायकवृंदाचे विशेष सादरीकरण या रजनीची शोभा वाढवेल. यावेळी दिले जाणारे खाद्यपदार्थ भारतीय तसेच फ्रेंच दोन्ही प्रकारचे असतील.
मंत्र्यांनी पुढे घोषणा केली की भारत हा “आगामी कान्स मध्ये सन्माननीय देश असेल, ज्या अंतर्गत 5 नवीन स्टार्ट अप्सना दृक-श्राव्य उद्योगात प्रवेश करण्याची संधी दिली जाईल. अॅनिमेशन डे नेटवर्किंगमध्ये दहा व्यावसायिक सहभागी होतील.
कान्स चित्रपट महोत्सवाच्या या आवृत्तीत भारताच्या सहभागाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आर. माधवन द्वारे निर्मित “रॉकेट्री” या चित्रपटाचा जागतिक प्रदर्शन सोहळा(वर्ल्ड प्रिमियर) होणार आहे. हा चित्रपट 19 मे 2022 रोजी पॅलेस डेस फेस्टिव्हल ऑफ द मार्केट मध्ये प्रदर्शित केला जाईल.
“कान्स विभागासाठी जाऊ शकणारे” या विभागात 5 निवडक चित्रपट निश्चित करण्याची संधी भारताला देण्यात आली आहे. हे चित्रपट फिल्म बाजार अंतर्गत वर्क इन प्रोग्रेस लॅबचा भाग आहेत.
- जयचेंग झाई दोहुतिया यांचा बाघजन – आसामी, मोरान
- शैलेन्द्र साहू यांचा बैलाडिला – हिंदी, छत्तीसगढी
- एकतारा कलेक्टिव्ह यांचा एक जगह अपनी(ए स्पेस ऑफ अवर ओन) –हिंदी
- हर्षद नलावडे यांचा फॉलोअर- मराठी, कन्नड, हिंदी
- जय शंकर यांचा शिवम्मा – कन्नड
“प्रदर्शित न झालेल्या” चित्रपटांसाठी 22 मे 2022 रोजी ऑलिम्पिया स्क्रीन नामक चित्रपटगृह भारतासाठी समर्पित असणार आहे. या विभागासाठी पाच चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. सत्यजित रे यांच्या शताब्दीनिमित्त भारताचा सोहळा कान्स महोत्सवात सुरु राहील. यानिमित्त सिनेमा द ला प्लाग या कान्स क्लासिक विभागात सत्यजित रे यांचा प्रतिद्वंदी हा अभिजात चित्रपट सादर करण्यात येईल.
मुख्य रंगमंचावर, समर्पित भारतीय मंच ही एक तासाची परिषद आयोजित करण्यात येणार आहे. यात मनोरंजन क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती सहभागी होतील आणि “जगाचे समृध्द आशयनिर्मिती केंद्र या रुपात भारता”ला प्रस्थापित करण्यात येईल. या भारतीय मंचावर शेकडो पाहुणे उपस्थित असतील आणि या कार्यक्रमाचे थेट ऑनलाईन प्रसारण केले जाईल.
या वेळच्या भारतीय पॅव्हेलियनच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, जगभरात भारताचा गौरव वाढवून “जगातील समृद्ध आशयाच्या क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र” म्हणून स्थापित करणे यावरच या पॅव्हेलियनचे संपूर्ण लक्ष केंद्रित असेल. 18 मे 2022 रोजी या पॅव्हेलियनचे उद्घाटन होईल. यामध्ये देशाचे भाषाविषयक,सांस्कृतिक आणि प्रादेशिक वैविध्य दर्शविणारे भारतीय चित्रपट सादर होतील आणि जगभरातील समुदायांतून आलेल्या प्रतिनिधींसाठी संबंधवृद्धीचा मंच म्हणून काम करतील. चित्रपटांचे चित्रिकरण, वितरण, निर्मिती, पटकथा विकास, तंत्रज्ञान, चित्रपटांच्या विक्रीला प्रोत्साहन आणि संघटन यामध्ये आंतरराष्ट्रीय भागीदारी स्थापन करण्याच्या उद्देशाने हा पॅव्हेलियन कार्य करेल.