Sri Lanka in financial crisis; पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचा राजीनामा

नवी दिल्ली : आर्थिक संकटातून जात असलेले श्रीलंकेचे(Sri Lanka) पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. दुसरीकडे, दुसऱ्यांदा झालेल्या आणीबाणीदरम्यान झालेल्या हिंसक संघर्षात मंगळवारी सत्ताधारी पक्षाच्या खासदारासह तिघांना जीव गमवावा लागला. वृत्तसंस्था एएफपीच्या वृत्तानुसार, सोमवारी झालेल्या हिंसक चकमकींमध्ये 150 हून अधिक लोक जखमी झाल्याचीही माहिती आहे.Sri Lanka in financial crisis.

अहवालानुसार, पंतप्रधान महिंदा राजपक्षे(Mahinda Rajapaksa) यांच्या समर्थकांनी शांततापूर्ण निदर्शकांवर हल्ला केल्यानंतर देशभरात हिंसाचार उसळला आहे. राजधानीतून परतणाऱ्या राजपक्षे यांच्या समर्थकांवर लोकांनी संताप व्यक्त केला. त्यांनी अनेक शहरांमध्ये त्यांची वाहने अडवून त्यांच्यावर हल्ले केले.

अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या कार्यालयासमोर त्यांच्या समर्थकांनी सरकारविरोधी नेत्यांवर हल्ला केल्यानंतर महिंदा राजपक्षे(Mahinda Rajapaksa) यांनी राजीनामा दिला. या हल्ल्यात 174 जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली असून राजधानीत लष्कर तैनात करण्यात आले आहे.

1948 मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर श्रीलंका(Sri Lanka) सर्वात वाईट आर्थिक टप्प्यातून जात आहे. परकीय चलनाच्या साठ्याच्या तुटवड्यामुळे हे संकट उद्भवले आहे, म्हणजेच देशाला अन्नधान्य, इंधनाच्या आयातीचा खर्च भागवता येत नाही. सरकारकडे आयातीसाठी लागणारा निधी संपल्याने 9 एप्रिलपासून श्रीलंकेत हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत.


Bank holidays in May: मे महिन्यात बँका 11 दिवस बंद, पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी 

LIC ने FY 2022 मध्ये प्रति मिनिट 41 पॉलिसी विकल्या, IPO या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 

Social Media