मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी टीव्ही अभिनेत्री केतकी चितळे(Ketaki Chitale) हिला कळंबोलीतून ताब्यात घेतले आहे.
अभिनेत्री केतकी चितळे हीने नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये शरद पवारांवर, अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिका केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी केतकीच्या विरोधात ठाण्याच्या कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला . यानंतर पुण्यातदेखील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केतकीने केलेल्या पोस्टमध्ये “ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतोय नरक” असे शब्द वापरण्यात आले आहेत, या आक्षेपार्ह पोस्टनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकते आक्रमक झाले.
आज सकाळी केतकी चितळे हिला नवी मुंबई पोलिसांनी कळंबोली येथून ताब्यात घेतले आहे. नवी मुंबई पोलिसांकडून ठाणे गुन्हे शाखेने केतकीला ताब्यात घेतले आहे.