मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला अभिनयाबरोबरच तिच्या बिनधास्त वक्तव्यासाठी देखील ओळखली जाते. ती प्रत्येक विषयावर उघडपणे आपले मत व्यक्त करते. सुशांतसिंह राजपूत यांच्या निधनानंतर कंगना नेपोटिझम सारख्या बर्याच मुद्द्यांविषयी ती बोलत आहे. कंगना आजही चित्रपटसृष्टीतील एका विशिष्ट गटावर निशाणा साधत आहे. दरम्यान सोमवारी कंगनावर बहिष्कार टाकण्यासाठी हॅशटॅग बायकॉट कंगना अशा ट्रेंडची सुरुवात झाली. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना कंगनाने स्वत:ला सॅनिटायझर आणि करण जोहर, वरुण धवन, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना व्हायरस असल्याचे म्हटले आहे.
ट्विटर अकाउंटवर कंगना रनौतने एक फोटो सामायिक केला आहे. यात एका बाजूला कंगना आणि दुसर्या बाजूला रणबीर कपूर, करण जोहर, आलिया भट्ट आणि वरुण धवन यांचे चित्र आहे. कंगनाच्या चित्रावर ‘सॅनिटायझर’ लिहिले आहे, तर इतर सेलेब्सच्या फोटोंवर ‘व्हायरस’ असे लिहिलेले आहे. हा फोटो सामायिक करताना कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘उंदरांनो बिळात परत जा, नाहीतर गब्बर येईल. तुम्हाला फिल्म स्टाईलने हुल द्यायची असेल तर अश्या प्रकारे द्या. हॅशटॅग बायकॉट कंगना ने मला भीती नाही वाटत, वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. ‘
काही दिवसांपूर्वी कंगनाने भारत सरकारकडे करण जोहरचा पद्मश्री पुरस्कार मागे घेण्याची मागणी केली होती. तिने ट्विटरवर लिहिले होते की, ‘मी भारत सरकारला करण जोहरचा पद्मश्री पुरस्कार मागे घेण्याची विनंती करते. त्याने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मला उघडपणे धमकी दिली होती आणि मला इंडस्ट्री सोडण्यास सांगितले होते. त्याने सुशांतची कारकीर्द उध्वस्त केली. उरी घटनेच्या वेळी त्याने पाकिस्तानला पाठिंबा दर्शविला होता आणि आता त्याने सैन्याविरूद्ध एक अँटीनॅशनल फिल्म बनविली आहे.
चूहों वापस बिल में चले जाओ वरना गब्बर आ जाएगा… फ़िल्मी स्टाइल हूल देनी है तो ऐसे देते हैं, #Boycott_Kangana ट्रेंड से मुझे ड़र नहीं लगता 🙂 जाओ कुछ और ट्राई करो … pic.twitter.com/t8j6Q0jZin
— Kangana Ranaut (@KanganaTeam) August 24, 2020