गृहकर्ज पुन्हा महागले, HDFC ने घर खरेदीदारांवर वाढवला EMI भार

मुंबई : HDFC हाऊसिंग या अग्रगण्य गृहकर्ज कंपनीने घरांच्या कर्जावरील रिटेल प्राइम लेंडिंग रेट (RPLR) मध्ये पुन्हा एकदा वाढ केली असून, त्यांच्या नवीन आणि जुन्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. याचा थेट परिणाम तुमच्या होम लोन ईएमआयवर(EMI ) होईल. तुमच्या बँकेने EMI न वाढवल्यास, वाढलेला दर तुमच्या कर्जाच्या परतफेडीच्या वर्षांमध्ये समायोजित केला जाईल. HDFC ने RPLR 5 बेसिस पॉईंटने वाढवला आहे. महिन्याभरात तिसऱ्यांदा बँकेने आरपीएलआरमध्ये(RPLR) वाढ केली आहे.

यापूर्वी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने काही दिवसांपूर्वी रेपो दरात वाढ करण्याची घोषणा केली होती आणि रेपो दर 4% वरून 4.40% पर्यंत 40 bps ने वाढवला होता. RBI च्या या निर्णयानंतर, HDFC Ltd ने देखील 0.30 टक्‍क्‍यांनी वाढ जाहीर केली, ज्यामुळे विद्यमान आणि नवीन दोन्ही ग्राहकांसाठी गृहकर्ज घेणे महाग झाले. आता पुन्हा HDFC ने RPLR वाढवला आहे.

एचडीएफसीपूर्वी, आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडियासह इतर अनेक कर्ज देणाऱ्या संस्थांनीही दर वाढवले ​​आहेत.

याआधी 9 मे रोजी जेव्हा HDFC ने RPLR वाढवला तेव्हा ‘HDFC ने हाऊसिंग लोनवरील RPLR 30 बेसिस पॉईंटने वाढवला’. यापूर्वी ही वाढ 9 मे पासून लागू झाली होती आणि आता पुन्हा एकदा HDFC ने RPLR वाढवला आहे, ज्यामुळे गृहकर्जावर EMI भरणाऱ्या ग्राहकांना आता जास्त EMI भरावी लागेल.


दारूप्रमाणेच पेट्रोल-डिझेलवरील करातही ५० टक्के कपात करून जनतेला दिलासा द्या

PPF Investment Rules: सरकारने बदलले PPF गुंतवणुकीचे नियम

Social Media