Maharashtra HSC Results : महाराष्ट्र बोर्डाचा १२वीचा निकाल जाहीर

मुंबई : महाराष्ट्र बोर्डाचा १२वीचा निकाल जाहीर झाला (Maharashtra Board Class 12 results declared). बोर्डाने निकालाची आकडेवारी जाहीर केली आहे. राज्याचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. दुपारी 1 नंतर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहेत. जवळपास दीड लाख विद्यार्थी आणि पालक निकाल कधी लागणार या चिंतेत होते.

mahahsscboard.in आणि msbshse.co.in या अधिकृत वेबसाइटवर निकाल जाहीर केला जाईल. दरवर्षी १० लाखांहून अधिक विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल देतात. गेल्या वर्षी 12 लाख विद्यार्थ्यांपैकी 99.63 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. महाराष्ट्र बोर्डाच्या उत्तीर्णतेची ही सर्वाधिक टक्केवारी आहे.

राज्याचा बारावीचा निकाल 94.22 लागला आहे, ज्यात गेल्यावर्षीच्या तुलनेने 5.31 टक्क्यांनी खाली आला आहे. मागील वर्षी हा निकाल ९९.५३ टक्के होता.. 24 विषयाचा निकाल 100 टक्के लागला आहे.

कोकण विभाग टॉपवर, तर औरंगाबाद सर्वात कमी

सर्व विभागीय  मंडळांमधून नियमित  विद्यार्थ्यांमध्ये कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.२२ टक्के निकाल आहे तर सर्वात कमी मुंबई विभागाचा निकाल(९०.९१) आहे .

विभागनिहाय निकाल

कोकण – 97.22
पुणे – 93.61
कोल्हापूर – ९५.०७
अमरावती – 96.34
नागपूर – 96.52
लातूर – 95. 25
मुंबई – 90.91
नाशिक – 95.03
औरंगाबाद – 94.97

यंदाही मुलींनीच मारली बाजी

बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळातुन नियमित विद्यार्थ्यांनी ९५.३५ टक्‍के लागणार आणि मुलांचा ९३.२९ टक्‍के निकाल लागणार आहे. 2.06 टक्के अधिक  मुली पास झाल्या आहेत.

 

Social Media