दक्षिण मध्य क्षेत्र संस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय, भारत सरकार)  साठी गौरवशाली प्रसंग

मुंबई : 2016 साली राजभवन, मुंबई येथे एक ब्रिटिशकालीन ऐतिहासिक भुयार सापडले. या भुयाराची लांबी अंदाजे 2 किलोमीटर असून रुंदी 12 ते 15 फूट आहे. भुयाराच्या दोन्ही बाजूस 13 खोल्या आहेत. त्याकाळी ब्रिटिश सैनिक भारतीय स्वातंत्र्य सैनिकांच्या विरुद्ध वापरावयाचा दारुगोळा व तोफखाना या भुयारात खोल्यांमध्ये ठेवीत असत.
आपल्या सध्याच्या माननीय राज्यपाल महोदयांनी या भुयाराचे रूपांतर सशस्त्र क्रांतिकारकांच्या म्युझियम मध्ये व्हावे अशी संकल्पना मांडली. ही जबाबदारी सुविख्यात इतिहासकार व लेखक डॉ. विक्रम संपत यांचेवर सोपवण्यात आली. त्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यात महाराष्ट्रातील अपरिचित अश्या 75 स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणींवर आधारित संग्रहालय व्हावे असे योजले. त्यासाठी आवश्यक असे murals, paintings, मूर्ती व इतर कलात्मक काम करण्याची जबाबदारी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय, भारत सरकार) वर सोपवली गेली.
आनंदाची बाब अशी की दमक्षेसां केंद्राने ही जबाबदारी अतिशय कमी वेळेत यशस्वीपणे पूर्ण केली. संपूर्ण भुयार विविध कलाकृतींनी सजले. स्वातंत्र्यवीरांची गाथा तिथे निर्माण करण्यात आली.
दिनांक 14 जून 2022 रोजी या भुयारी क्रांतिकारी गाथा संग्रहालयाचे उदघाटन अत्यंत थाटात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे, तसेच मा. उपमुख्यमंत्री श्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. श्री अशोक चव्हाण तसेच विरोधी पक्ष नेता मा.श्री देवेन्द्र फडणवीस या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. संचालक, दमक्षेसां केंद्र, नागपूर डॉ दिपक खिरवडकर समारंभाला उपस्थित होते.
काल दिनांक 15 जून 2022 रोजी माननीय राज्यपाल महोदयांच्या हस्ते या यशस्वी कामगिरी साठी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. दिपक खिरवडकर आणि केंद्राच्या इतर कलावंतांचा सत्कार करण्यात आला.
राजभवन परिसरातील या संग्रहालयात दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरचे नाव नेहेमीसाठी कोरल्या गेले आहे. नागपूर साठी आणि केंद्रासाठी हा अत्यंत गौरवशाली क्षण आहे.
Social Media