पुणे : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये प्रथमच संस्कार वर्गातून आता सार्वजनिक स्तरावर( शून्य कचरा )चे संस्कार मुलांमध्ये रुजवण्याचे कार्य “श्री स्वामी समर्थ ” संस्कार वर्ग ( शुन्य कचरा) च्या माध्यमातून सुरू झाले आहे.
अर्चना मोरे, संस्थापक, आसरा सोशल फौंडेशन, पुणे यांच्या शून्य कचरा मोहीमेतून आज महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात प्रथमचं “संकल्प स्वच्छतेचा सुंदर भोसरीचा” या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रवादी चे शहर अध्यक्ष श्री अजित गव्हाणे आणि वैशाली ताई गव्हाणे यांच्या सहकार्याने महादेव नगर पांडुरंग निवास येथे साकार झाली आहे.
उषा शिवाजी घुगे आणि श्री शिवाजी पांडुरंग घुगे यांच्या “श्री स्वामी समर्थ” संस्कार वर्गात श्लोक/प्रार्थना/पसायदान/व्यक्तिमत्त्व विकास/भाषा विकास अश्या अनेक विषयांवर संस्कार देण्याचे कार्य सुरू होते.
शून्य कचरा करायचा असेल तर विद्यार्थी हा एकमेव घटक परिवर्तनासाठी केंद्र बिंदू समजला जातो.कचरा वस्तू आहे. त्याची योग्य विल्हेवाट लावली तर डजबिन ची आवश्यकता पडत नाही. तेव्हा अर्चना मोरे यांनी उषा ताईंना “शून्य कचरा चे संस्कार वर्ग चालू करण्याची कल्पना सुचविली आणि ताईंनी क्षणातच दुजोरा दिला.
आज ताईंच्या स्वतःच्या 1बी एच के फ्लॅट मध्ये सुरू असलेल्या संस्कार वर्गात कोणतीही फिस न घेता वेगवेगळ्या शाळेचे 50 विद्यार्थी “शून्य कचऱ्याचे” धडे घेत आहेत. आणि या व्यतिरिक्त आणखी 50 विद्यार्थी शून्य कचऱ्याचे संस्कार घेण्यासाठी तयार आहेत.
आपण कित्येक गोष्टीचे संस्कार घेतो मग शून्य कचऱ्याचे का नाही. आज जर विद्यार्थी दशेत हे संस्कार रुजले तर प्रथा कायम राहील आणि हीच पुढचे 200 वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त परंपरा रूढ होईल.
वैशाली ताई म्हणाल्या की विद्यार्थी आई वडील यांच्या पेक्षा गुरूंचे जास्त ऐकतात तेव्हा शून्य कचरा होण्यासाठी विद्यार्थी जास्त प्रतिसाद देत आहेत.
पालक श्री. शशिकांत बेहरे म्हणाले की माझा मुलगा आदित्य पाहिले पेक्षा आता कचऱ्याविषयी जास्त जागरूक झाला आहे. प्लास्टिक कुठेही न टाकून देता तो त्याचे एकोब्रिक्स तयार करत आहे. सर्व विद्यार्थी शाळेच्या बॅग मध्ये रिकामी प्लास्टिक बॉटल ठेवतात. चॉकलेट, कुरकुरे, बिस्कीट खाल्ल्यानंतर प्लास्टिक रिकाम्या बॉटल मध्ये टाकले जातात.
अजित गव्हाणे सरांनी (शून्य कचऱ्याचे संस्कार वर्ग) या कल्पनेसाठी शिक्षक, पालक, विद्यार्थी यांना शुभेच्छा दिल्या.. आणि भोसरी मध्ये प्रत्येक नगरात संस्कार वर्ग चालू करण्यासाठी पुढचे पाऊल असेल असे ते म्हणाले.
यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका “इ” प्रभागातील आरोग्य अधिकारी श्री राजू साबळे सर आणि वॉर्ड 5 चे सॅनिटरी इन्स्पेक्टर श्री. एस. घाटे सर, श्वेता शिंदे, राजू मुलूक, किरण निंबकर, सौ. अंबड, सौ. वरिये, शाहू केंद्रे, सुनीता कदम उपस्थित होते.