मुंबई : मुख्यमंत्री पद मला अनपेक्षीतपणे मिळाले तसे ते मी अनपेक्षीतपणे सोडत आहे, माझ्याच माणसांचे रक्त सांडून मला सत्ता नको आहे, जे सोबत आहे त्यांच्या सोबत राहून बाळासाहेबांच्या शिवसेनेला पुन्हा वाढविण्यासाठी मी सेनाभवनात बसणार आहे असे म्हणत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ( Uddhav Thackeray )यांनी पदाचा आणि आमदारकीचा देखील राजीनामा दिला आहे.
शिवसेनेच्या आमदारांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर अभूतपूर्व राजकीयआणि वैधानिक घडामोडीना जन्म देत अखेर ठाकरे सरकारला खाली खेचण्यात विरोधकांना यश आले आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गुरूवारी विशेष अधिवेशन घेऊन बहुमत चाचणी घेण्याच्या दिलेल्या आदेशानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे महत्व देखील मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्याने राहिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे..राज्यपालांच्या या निर्णयाला शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र महाविकास आघाडी सरकारची बहुमत चाचणी पुढे ढकलण्याची मागणी न्यायालयाने फेटाळत ठाकरे सरकारला धक्का दिला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव मधून पुन्हा जनतेशी संवाद साधत मुख्यमंत्रीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला. शिवसेना नेते अनिल परब यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेवून त्यांना राजीनामा सुपूर्द केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray )यांनी समाज माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधताना सांगितले की, मी हिंदुत्वाचा विचार करत नाही असे सांगत काही लोक गेले मात्र नामांतराचा निर्णय केवळ चार शिवसेना मंत्री असताना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सहकारी पक्षांनी सहकार्य केल्याने कोणताही विरोध न होता घेतला आहे. जे यापूर्वी हिंदूत्वाची भाषा करणारे करू शकले नाहीत असे ते म्हणाले. गेल्या अडीच वर्षात सहकार्य करणार शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यासह सरकारीमंत्री नेते यांचे त्यांनी आभार मानले. ते म्हणाले की ज्यांना बाळासाहेबानी पदे दिली प्रतिष्टा दिली ते मला आणि शिवसेनेला सोडुन गेले असतानाही ज्यांच्या विरोदता राजकीय संघर्ष केला त्यानी मित्रत्वाने साथ दिली, त्यामुळेच आजही अशोक चव्हाण यानी सरकारच्या बाहेर राहून पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले की चीनआणि पाकिस्तानच्या सिमेवरचे सैन्य मुंबईत आणुन शिवसैनिकांच्या रक्तासोबत कुणाला सत्तेचा गुलाल उधळुन रस्ते लाला करायचे असतील तर मला ते नको आहे ते म्हणाले की, ज्यंना सगळे दिले पदे पैसा दिला ते गेले मात्र ज्याना काहीच दिले नाही ते शेनिका धिराने आजही सोबत आहेत त्यांना पोलीसांनी स्थानबध्द केले आहे त्यांचे रक्त मला सांडायचे नाही म्हणून उद्या जे येतील त्यांना सत्तेचा शपथविधी करू दया त्यांच्या विजयाचा गोडवा हिरावून घेवू नका असे ते म्हणाले. असे आवाहन त्यानी कार्यकर्त्याना केले, ते म्हणाले की मी पुन्हा सेनाभवनात बसून माझ्या ख-या माझ्या माणसासोबत बाळसाहेबांची शिवसेना (Shiv Sena)उभी करेन असे ते शेवटी म्हणाले