मुंबई : तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही खरोखरच आनंदाची बातमी आहे. जागतिक कोरोना महामारीच्या काळात भारतीय रेल्वेने (Indian Railways)प्रवाशांसाठी अनेक निर्बंध लादले होते, जे आता हळूहळू हटवले जात आहेत. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन असाच एक महत्त्वाचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. आता मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या सामान्य डब्यातून आरक्षित तिकिटांनी प्रवास करण्याची अट रद्द करण्यात आली आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या सूचनेवरून पूर्व-मध्य रेल्वे व्यवस्थापनाने प्रवाशांची सोय लक्षात घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा थेट अर्थ असा आहे की, आता कोरोनाच्या काळात कोणताही प्रवासी आरक्षित तिकीटाशिवाय मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचे जनरल तिकीट काढून जनरल बोगीतून प्रवास करू शकतो.
या निर्णयाचा थेट फायदा सर्वसामान्य प्रवाशांना होणार आहे. आता त्याला सर्व प्रकारच्या पॅसेंजर ट्रेनमध्ये जनरल तिकिटावर प्रवास करता येणार आहे. पूर्व-मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी वीरेंद्र कुमार यांनी सांगितले की, प्रवाशांना होत असलेल्या समस्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
“रेल्वे व्यवस्थापनाने कोणत्याही मेल-एक्स्प्रेस ट्रेनच्या सर्वसाधारण बोगीत प्रवास करण्यासाठी आरक्षणाची अट काढून टाकली आहे,” असे अधिकारी म्हणाले. आता कोणताही प्रवासी पूर्वीप्रमाणेच मेल-एक्स्प्रेसचे जनरल तिकीट काढून या गाड्यांच्या जनरल डब्यातून प्रवास करू शकतो.