पावसाळी अधिवेशनापूर्वी होणार मंत्रिमंडळाचा विस्तार….

नवी दिल्ली  : आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या पावसाळी अधिवेशनापूर्वी केला जाईल, आषाढी एकादशीची(Ashadhi Ekadashi) पूजा झाल्यानंतर त्यावर चर्चा केली जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी स्पष्ट केले आहे.

दिल्लीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्यासह अनेक नेत्यांची भेट घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्याच्या प्रगतीत केंद्र शासनाच्या सहकार्याची महत्वाची भूमिका असून केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने महाराष्ट्राचा सर्वतोपरी विकास साधणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.

शिंदे म्हणाले, सर्वसामान्य जनता, शेतकरी व समाजाच्या सर्व घटकांच्या विकासासाठी आम्ही सरकार स्थापन केले आहे. हे सरकार राज्यातील सर्व घटकांच्या हितांची जपणूक करण्यासाठी कार्यरत राहील व यासाठी केंद्रशासनाच्या सहकार्याची आवश्यकता आहे. म्हणूनच सरकार स्थापनेनंतर शिष्टाचाराप्रमाणे राष्ट्रपती , प्रधानमंत्री व केंद्रीय मंत्र्यांच्या सदिच्छा भेटी घेण्यासाठी उपमुख्यमंत्र्यासह दिल्लीत आलो असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांचे महाराष्ट्राच्या विकासाबाबतचा दृष्टीकोन समजून घेऊन केंद्राच्या सहकार्याने राज्याला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दुपारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांची लोक कल्याण मार्ग या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेउन त्यांनी राज्यातील प्रकल्प , योजना आणि इतर महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाल्याची माहिती ही मुख्यमंत्र्यानी यावेळी दिली.

Social Media