Shehzada: कार्तिक आर्यनने शेअर केला ‘शेहजादा’चा फर्स्ट लुक

मुंबई: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने(Kartik Aaryan) शनिवारी त्याच्या सोशल मीडियावर आगामी ‘शेहजादा'(Shehzada) चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला. यासोबतच त्याने ‘शेहजादा’ची(Shehzada) रिलीज डेटही जाहीर केली आहे. हा चित्रपट आधी या वर्षी नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार होता पण आता कार्तिकच्या पोस्टनुसार तो आता पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये रिलीज होणार आहे. यावर्षी  कार्तिक आर्यनने(Kartik Aaryan) बॉलीवूडला त्याचा सर्वात मोठा हिट चित्रपट ‘भूल-भुलैया 2’ दिला, जो समीक्षकांसोबतच चाहत्यांनाही आवडला होता.

एकीकडे चाहते ‘शेहजादा’च्या(Shehzada) फर्स्ट लूकसाठी खूपच उत्सुक आहेत, तर काही चाहते चित्रपटाच्या रिलीजला उशीर झाल्याबद्दल निराशही आहेत. शनिवारी दुपारी, कार्तिकने चित्रपटातील स्वतःचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, “शहजादा 10 फेब्रुवारी 2023 रोजी येणार” फोटोमध्ये, कार्तिक कॅमेराकडे वेगाने धावताना दिसत आहे. शहजादामध्ये क्रिती सॅनन (Kriti Sanon)देखील आहे,  कार्तिकने त्याच्या ट्विटमध्ये इतर क्रू सदस्यांसह टॅग केले आहे. पोस्टरवर प्रतिक्रिया देताना अभिनेत्याच्या चाहत्यांनी कार्तिकच्या लूकचे कौतुक केले आहे.

कार्तिकच्या ट्विटला उत्तर देताना एका चाहत्याने लिहिले, ‘धमाका ते शहजादापर्यंत, इंटेंसिटी तुमच्यावर सूट करतेय…’ दुसऱ्या एका चाहत्याने ट्विट केले, ‘मी हा सुपरहिट पाहु शकतो.’ दुसऱ्या एका चाहत्याने ट्विट केले., ‘तुझ्या आधीच्या चित्रपटांपेक्षा हा जास्त हिट असेल. ..’ मात्र, कार्तिकला पडद्यावर पाहण्यासाठी आणखी तीन महिने वाट पाहण्यात अनेकजण नाराज होते. एका संतप्त चाहत्याने ट्विट केले, “ते का पुढे ढकलण्यात आले?’ दुसर्‍याने ‘निराश’ हॅशटॅग जोडला आणि लिहिले, ‘वर्षातील 2 चित्रपट ठीक होते, तुम्ही हे नोव्हेंबर 2022 मध्ये प्रदर्शित करू शकता’


‘पुष्पा’ची क्रेझ अजून संपलेली नाही, अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने आता रचला नवा विक्रम

सुष्मिता सेन-ललित मोदींची प्रेमकहाणी, उघडपणे व्यक्त केले प्रेम

Social Media