Richa Chadha-Ali Fazal Wedding: रिचा चढ्ढा आणि अली फजल यांचं ठरलं, सप्टेंबरमध्ये करणार लग्न

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा (Richa Chadha)आणि अली फजल (Ali Fazal)यांचे लग्न  ठरले असून ते सप्टेंबर महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू असून लग्न मुंबई किंवा दिल्लीत होणार आहे.  त्यांच्या लग्नात जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

ऋचा चढ्ढा आणि अली फजल 2021 मध्ये लग्न करणार होते. पण कोरोना महामारीमुळे त्यांचे लग्न लांबले. याआधी ते मार्चमध्ये लग्न करणार असल्याच्या अफवा होत्या. सप्टेंबर महिन्यात ते लग्न करणार असल्याची बातमी इंडिया टुडेने दिली आहे.

रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी ‘फुक्रे’ आणि ‘फुक्रे रिटर्न्स’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. फुक्रे चित्रपटाच्या सेटवर रिचा आणि अली यांची मैत्री झाली आणि त्यांची मैत्री नंतर प्रेमात बदलली. हे दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघे एकत्र राहतात आणि सुट्टी एकत्र घालवतात. त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

रिचा आणि अली फजल येत्या काळात ‘फुक्रे 3’ मध्ये एकत्र दिसणार आहेत. अली फजल ‘डेथ ऑन द नाईल’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये प्रेक्षकांसमोर येत आहे. मिर्झापूरच्या पुढच्या सीझनच्या शूटिंगमध्येही तो व्यस्त आहे. सध्या रिचा चढ्ढा ‘फुक्रे 3’ आणि ‘अभी तो पार्टी शूर हुई है’ या दोन चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, जे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तसेच रिचा चड्ढा आणि अली फजल संयुक्तपणे ‘गर्ल्स विल बी गर्ल्स’ चित्रपटाची निर्मिती करत आहेत.


 तरुणांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखणार प्रिया प्रकाश, काय आहे ‘ट्रॅप्ड झोन’ जिची अभिनेत्री बनली ब्रँड अॅम्बेसेडर

Social Media