मोदीजींच्या आवाहनाला देशवासीयांचा प्रतिसाद

“हम करे राष्ट्र आराधन|” हा एकमेव उद्देश समोर ठेवून राष्ट्रहितासाठी कार्य करणे हेच ध्येय, आपली प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची असावी हाच ध्यास मनात ठेवून एक सेवक म्हणून कार्य करण्याची अनोखी शैली भारताचे पंतप्रधान श्री मोदीजींची आहे. गेल्या आठ वर्षात पंतप्रधानांनी चार वेळा जनतेला आवाहन केलं. त्याला मिळालेला प्रतिसाद अनोखा आहे. कारण “राष्ट्र सर्वोपरी” हा भाव मनामनात जागृत होत आहे.

एका स्वातंत्र्य दिनाच्या संबोधनात, 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून त्यांनी स्वच्छतेचा मंत्र दिला. स्वतः पुढाकार घेऊन, हातात झाडू घेवून परिसर स्वच्छ केला. निश्चितच ते प्रतिनिधिक स्वरूपाचे होते. स्वच्छते संबंधी त्यांची सजगता आपण जाणतोच. परंतु पुढे ती राज्यव्यापी, देशव्यापी चळवळ बनली. आज आपण बघतो स्वच्छता हा एक मूल मंत्र बनला आहे. “स्वच्छ भारत” अभियान ही एक यशस्वी मोहीम ठरली आहे.
मार्च २०२०, कोरोनाचा सुरुवातीचा काळ हा अत्यंत बिकट होता. कोरोना हा आजार काय आहे? हेच कोणाला कळेना. अशावेळी जनतेचे धैर्य वाढविणे, त्यांना मानसिक आधार देणे अगत्याचे होते. अशा वेळी घरोघरी दीपप्रज्वलित करण्याचे, टाळ्या, थाळ्या, शंख-घंटा वाजविण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. घरोघरी दिवे लावले गेले. संपूर्ण देशात संकटाला सामोरे जाण्याचे धैर्य, जिद्द मनामनात निर्माण झाली. आज त्या भयावह परिस्थितीवर सुद्धा आपण मात केली आहे.

कोरोनाची लस तयार झाली. आणि आवाहन झालं प्रत्येकानं “कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी”. प्रचंड प्रयत्न झाले देशवासी यांनी उदंड प्रतिसाद दिला आणि 200 करोडहून अधिक कोरोनाप्रतिबंधक लस घेतली गेली.
आता तर स्वातंत्र्याच्या “अमृत महोत्सवी” वर्षात “हर घर तिरंगा”चे आवाहन करण्यात आले. त्यासाठी काही नियम शिथिल करण्यात आले. स्वातंत्र्याचा हा सोहळा एक महोत्सव ठरावा आणि यात प्रत्येक भारतीयाचा सहभाग असावा. ..आणि कालपासून घरोघरी तिरंगा लहरू लागला. तो तिरंगा गाव पाड्यापासून ते उंच उंच नागरी इमारतीवर आज उंच गगनात लहरताना आपण बघतोय. वृत्तपत्रे, समाजमाध्यम, दूरचित्रवाणी यावर बातम्या येताहेत. संपूर्ण भारत तिरंगामय झाला आहे.

गाव कुसाबाहेर दूरवर राहणाऱ्या आमच्या भटके समाज बांधवांच्या पालावर सुद्धा जेव्हा अभिमानाने झेंडा फडकविला जातो तेव्हा “हिंदी है हम, वतन है, हिंदोस्ता हमारा” याची साक्ष पडते.
“विजयी विश्व तिरंगा प्यारा, झेंडा उंचा रहे हमारा”. तिरंगा घरोघरी लावला तेव्हा शांतता नव्हती होता तो, “जय हिंद”चा नारा, “भारत माता की जय” असा जयघोष. प्रत्येकाची छाती अभिमानाने इंचभर फुगतेच, अशावेळी.
देशभक्तीचे स्फुल्लिंग जागृत करण्याचे कार्य या “हर घर तिरंगा” अभियानाने होत आहे.
झेंडा फडकविण्याचा मान या अभियानामुळे प्रत्येक भारतीयाला मिळाला, हे केवढे भाग्य. “हर घर तिरंगा उपक्रम म्हणजे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला लाभलेली भरजरी किनारच.
करवट बदल रहा है देखो भारतका इतिहास, जाग उठा है हिंदू हृदयमे, विश्व विजय विश्वास|
जय हिंद| भारत माता की जय|

 

श्रीकांत तिजारे


‘मैत्री’ जीवनातील कमी…

Social Media