मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव(Raju Srivastava) यांची प्रकृती सध्या नाजूक आहे. शेखर सुमन यांच्यानंतर सुनील पाल(Sunil Pal) यांनी राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत मोठा अपडेट दिला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत सुनील म्हणाला- मित्रांनो! राजू श्रीवास्तव यांच्यासाठी प्रार्थना करा. ते अत्यंत गंभीर परिस्थितीतून जात आहेत. काय करावे हे डॉक्टरांनाही समजत नाही.
त्याच्या मेंदूनेही काम करणे बंद केले आहे. असे सांगून सुनील स्वतः भावूक झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. गेल्या काही दिवसांपासून येत असलेल्या बातम्यांनुसार त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत होते, मात्र आता नुकतेच त्यांच्या प्रकृतीशी संबंधित एक मोठे अपडेट समोर आले आहे.
View this post on Instagram
वृत्तानुसार, राजू यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. एम्समध्ये दाखल राजू श्रीवास्तव यांच्या बाबतीत ही बातमी खरोखरच चिंताजनक आहे. त्यांचे मुख्य सल्लागार अजित सक्सेना सांगतात की, आज सकाळी डॉक्टरांनी राजूचा मेंदू काम करत नसल्याची माहिती दिली आहे. हृदयाचा त्रासही होत आहे. आम्ही सर्व चिंतेत आहोत. सर्वजण देवाची प्रार्थना करत आहेत. घरातील सदस्यांनाही काही समजत नाही.