Ghe Double : ‘घे डबल’चा टीझर; कॉमेडी किंग भाऊ कदम आणि भूषण पाटील यांची धमाल जोडी!

मुंबई :    भाऊ कदम (Bhau Kadam) आणि भूषण पाटील (Bhushan Patil) यांच्या दुहेरी भूमिका असलेला ‘घे डबल’ हा चित्रपट 30 सप्टेंबरपासून सर्वत्र डबल कॉमेडी पाहायला मिळणार आहे, जिओ स्टुडिओ आणि फाइन क्राफ्ट निर्मित ‘घे डबल’ या चित्रपटाचे जबरदस्त टीझर पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आले होते. पोस्टरवर भाऊ आणि भूषण यांच्या दुहेरी भूमिकेची प्रेक्षकांना उत्सुकता लागली. आज या चित्रपटाच्या टीझरकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

घे डबलचे दिग्दर्शन विश्वास जोशी यांनी केले असून ज्योती देशपांडे आणि जिओ स्टुडिओज निर्मित आहेत. 30 सप्टेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात कॉमेडी किंग भाऊ कदम आणि अभिनेता भूषण पाटील यांच्यासह छाया कदम, भारत गणेशपुरे, किशोर कदम, ओंकार भोजने, विद्याधर जोशी आणि संस्कृती बालगुडे यांसारखे दमदार कलाकार दिसणार आहेत.

चित्रपटाचे दिग्दर्शक विश्वास जोशी म्हणतात, “जिओ स्टुडिओ वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यात तो ‘घे डबल’ हा कॉमेडी चित्रपट सादर करत आहे. हा पूर्णपणे मनोरंजन करणारा कौटुंबिक चित्रपट असून कदम आणि भूषण पाटील यांची जोडी विनोदी कलाकार असणार आहे. यासोबतच उत्तम कलाकार असलेला हा चित्रपट प्रेक्षकांचे दुप्पट मनोरंजन करेल हे नक्की!”

भाऊ कदम यांनी ‘घे डबल’ चित्रपटाचा टीझर पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे. पोस्टर शेअर करताना त्याने लिहिले की, ‘धमाल एंटरटेनमेंटचा डबलबार, सगळ्या टेन्शनवर डबल झटका देईल! भाऊ कदम यांच्या कॉमेडीचा डबल धमाका… ‘घे डबल’ ३० सप्टेंबरपासून सर्व चित्रपटगृहात तुमच्या भेटीला येत आहे.

 

Social Media