संवाद स्वतःशीच!!!!

आपल्या सभोवतालच्या वातावरणात इतक्या गोष्टी घडत असतात.
की आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही आणि त्याच गोष्टीचा आपल्या आयुष्यावर नकळत परिणाम होत असतो. आपलं आयुष्य हे काही संथपणे राहिलेलं नाही. समुद्राच्या लाटा एकमेकांवर जस जोमाने जातात. तसाच हे जीवन सुद्धा झालंय आणि अशाच धकाधकीच्या जीवनात आपलाच स्वतःशी संवाद हरवत जात आहे. आपण इतरांच्या दुनियेत इतकं हरवून जातो की आपल्या जीवनात काय सुरू आहे हे सुद्धा आपण विसरतो आणि त्या दुनियेत आपण स्वतः सुद्धा आहोत हे सुद्धा विसरून जातोय. आपल्या समोरच्या व्यक्तीसोबत जसा संवाद साधंन गरजेचं आहे.तसेच स्वतः स्वतः शी संवाद साधणे अगदी गरजेचे आहे आणि तो म्हणजे आत्मसंवाद.!!

ही एक कल्पना आहे. या रोजच्या धावपळीच्या जीवनात आत्मसंवाद नावाची गोष्ट असते हे सर्व विसरून जातात आणि ती अगदी महत्त्वाची असते. जेव्हा कधी आपल्या जवळची व्यक्ती आपल्या सोबत बोलणं सोडून देते आपल्या सोबत संवाद साधत नाही तेव्हा आपल्याला थोडं वाईट वाटते. आणि हळूहळू असं जाणवतं की आपली माणसं आपल्या पासून वेगळी होत चाललेली आहे त्यामुळे आपल्या मध्ये सुद्धा एकटेपणा निर्माण होतो. अगदी तसंच
आपल्या जवळची कोणी व्यक्ती असेल ती म्हणजे आपणच.

आपणच स्वतः स्वतःची मित्र आहोत तर आपण स्वतःचा स्वतःशी संवाद साधला नाही तर एका की एकटेपणा येईलच. मग आपणही स्वतःशी स्वतःचा संवाद थांबला तर सहाजिकच स्वतःलाही एकटेपणा जाणवेल. आणि मन चलबिचल होऊन एका जागी मन स्थिर ठेवता येणार नाही किंवा राहणारा ही नाही.
स्वतःच स्वतः शी संवाद थांबवला, तर नक्कीच एकटेपणा जाणवेल.
स्वामी विवेकानंद यांनी अतिशय सुंदर शब्द सांगितले आहे की.

दिवसातून एकदा तरी स्वतःशी बोला!!!
अन्यथा आपण या जगात एक उत्कृष्ट व्यक्तीला भेटायला गमवाल!!!
मित्रांनो आपण आयुष्यात काय गमावले आहे.व काय कमावले आयुष्यात किती चुका केल्या, किती मस्करी केली ,किती लोकांची निंदा केली, आणि किती लोकांची स्तुती केली, हे सर्व स्वतःलाच ठाऊक असतं . जर स्वतः शी संवाद साधला तर केलेल्या चुका सगळ्या मोकळ्या होतात .त्यात तुम्हाला कळतं की माझ्यापासून किती चुका झालेल्या आहेत. त्या वेळेला माझ वागणं कस होत . त्या वेळेला तस नको करायला होतं.
जर या सर्व संदर्भात स्वतःशी चर्चा केली तरी या सर्व बाबी स्वतः नियोजन करू शकतो. आणि चुका सुधारू शकतो..
कधीकधी काय होतं ना की स्वतःशी जर संवाद साधला नाही तर इतर सर्व गोष्टी सहनच होत नाही.
त्यामुळे आपलाच आपल्याशी संवाद होणे मुख्य गरजेचे आहे.
आजूबाजूला कितीही जवळची माणसं असली,तरीही खूप एकटेपणा जाणवतो.त्या मुळे आपला आपल्याशी संवाद होणे खूप गरजेचं आहे .नाहीतर एकटेपणा हा वाढत जाईल….!!! हे नक्कीच
ते वाढू देऊ नका
संवादा शिवाय हे आयुष्य अपूर्ण आहेच.. आणि तो म्हणजे आत्मसंवाद….
संवाद जर नसेल तर आयुष्य अबोली सारखं अबोल राहीलच हे खर!!!

 

पूजा गंगावणे!!!
नागपूर. सेमिनरी हिल्स.


घर एक मंदिर आहे…

‘मैत्री’ जीवनातील कमी…

Social Media