प्रत्येक घरातील दुर्गा….

एक अशी दुर्गा जी सगळ्या गोष्टी खूप बारकाईने बघते.
एक अशी दुर्गा जी आपल्या घरासाठी रात्रंदिवस झटते.
एक अशी दुर्गा जी नवऱ्यासाठी प्रत्येकवेळी खंबीरपणे उभा राहते.
एक अशी दुर्गा जी समाज्याच्या देण्याची जाण ठेवते.
एक अशी दुर्गा जी घर चालवत असतानाही समाजाला काही तरी देण्याचा अट्टहास करते.
एक अशी दुर्गा जी सकारात्मक गोष्टींची नेहमी उधळण करते.
एक अशी दुर्गा जी कुठल्याही गोष्टीचा बाऊ न करता सतत स्वतःला घडवत राहते.
अशी दुर्गा म्हणजे ‘पूजा’

समाजातील ‘ती’ च्या मनात चालली चलबिचल मांडत आहेत, आपल्या दुर्गा, सौ. पूजा विजय गंगावणे, नागपूर.

कोणालाही न समजणारी ती…
प्रत्येक घरातील दुर्गा….

किती सुंदर रचना केली आहे तिची परमेश्वराने….. किती सुंदर, निर्मळ असे मन दिले, मग तिने का जगावं दुसऱ्याच्या मनासारखं….! काय तिला हक्क नाही स्वतःच्या मनासारखं जगण्याचा, नेहमी दुसऱ्याच्या आनंदासाठी जगणारी ती कधी जगेल स्वतःसाठी…?

माहेरी असली की आईवडीलांच्या मनासारखं, लग्न झालं की परत दुसऱ्याच्या मनासारखं..
त्यांच्या सुखातच स्वानंद मानून घ्यावं लागते. तिला तिचे आयुष्य कुठे जगताच येत नाही.
ते म्हणतात ना,
काम नशिबी जिच्या रातदिनी
संसाराचा गाडा चालवी जोमानी
अवघे गृह असते जिचे ऋणी
तयास म्हणावे गृहिणी

तसेच काही होऊन जाते तिचे आयुष्य.आणि फक्त एक गृहिणी म्हणून ती ओळखली जाते. माहेरी असली की आई म्हणते अग किती अभ्यास करणार ? आधी काम करायला शिकून घे, काय करणार शिक्षण घेऊन? शेवटी लग्न करून संसारच तर सांभाळायचं आहे. मुलगी म्हणते अग मला तर आधी शिकायचं आहे, पण म्हणतात की आज मुलींनी व्यवस्थित राहणे गरजेचे आहे, मुलगी वयात आली की एकटे फिरू नये, मुलींनी जास्त बोलू नये, थोडे हसले की जोरात आवाज येतो…..पुरे झाले आता हसू, मुलींनी एवढं हसणं चांगले नाही….. मुलांशी बोलणे तर दूरच, त्यांच्याकडे बघू सुद्धा नये आणि कोणत्या मुलांनी आपल्याकडे पाहिले की निमूटपणे खाली मान करायची……बापरे किती….किती हे बंधन…? अरे ती चिमुकली लेक, तिला काय कळते एवढं सर्व आणि तिच्यावरच का तुम्ही एवढी बंधन लादत असता, कारण ती एक मुलगी जात आहे म्हणून…..! असेल स्त्री पण ती आज अबला नाही राहिली, ती आता एक सबला झाली आहे, ती आता सक्षम आहे, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला.

म्हणे वय जास्त झालं की मुलगा मिळत नाही, लग्न लवकर झालं की बरं असतं….किती दिवस चालेल हे सर्व….तिला आईवडिलांचे बोलणे ऐकावेच लागतात आणि शेवटी नाईलाजाने लग्नासाठी होकार येतो, कारण काय तर समाज…..हे समाज आपल्याला आणि आपल्या आईवडीलांना नको नको ते प्रश्न करेल, नको नको त्या गोष्टी करेल म्हणून….

आज अख्या जगात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पण स्वतःच्या घरात मुलींना स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचे स्वातंत्र्य नसते…… दुसऱ्यांची मुलगी कलेक्टर झाली, इंजिनिअर झाली, डॉक्टर झाली असे आपल्याच घरूनच ऐकायला मिळते आणि स्वतःच्या मुलीने तस् काहीही केलेलं जमत नाही…कारण काय जर लेक घराबाहेर निघाली तर कुठे काही चूक होऊन जाईल तर ??
असले विचार आपल्या लोकांचेच असतात.काय करणार त्यां लहानशा जीवाला गगनभरारी घ्यायची असते.हे जग पहायचं अस्त .पण कुठे कोण समजतं.तिला तर त्यांचं म्हणणं एकव लागेल च की.तिला अजिबात हक्क नाही स्वतःच्या स्वप्नं वर ..कोण तिला समजणार .

किती स्वप्न असतात त्या मुलीचे, आपण खूप मोठं व्हायचं, या खुल्या आसमंती उंच गगनझेप घ्यायची पण शेवटी तिच्या मनाविरुद्ध ती लग्नासाठी होकार देते, स्वतःच्या स्वप्नांची राखरांगोळी करून ओलांडते सासरचा उंबरठा, आणि मांडते संसाराचा थाट मोठ्या आशेने त्या जोडीदारासोबत….. पण लग्नानंतरही जे म्हटले, तेच तिला करावे लागते, त्याच्या म्हणण्याप्रमाणे तिला वागावे लागते, ती म्हणते की आता तरी शिकावं, ती तत्पर असते नौकरी आणि संसार सांभाळण्यासाठी पण तो तिच्यावर अविश्वास दाखवतो आणि संसाररुपी कैदखाण्यात ती पूर्ण पाने कैद होऊन जाते ….. मग काय आता मुलं बाळं झाली, आता त्यांना कोण सांभाळणार, मग गेला अवघा जन्म तिच्या मुलांचे पालनपोषण करण्यात…….???

बायकोने जरा वेळात वेळ काढून थोडा स्वतः च काम करते म्हटले की, अग आधी मुलांना बघ, तुझं काम तू नंतर कर, आणि काय करणार Exercise करून, तुला कुठे modeling करायला जायचं आहे…? तुला तर घरीच राहायचं आहे…..ते ही discourages असत. कधीच तिला Encourage करत नाही. पण वाटेवर एखादी slim lady दिसली की तिच्याकडे तिरप्या नजरेने टक लावून बघतो, म्हणजे काय पूर्ण बंधन स्त्रीलाच आणि पुरुषांना मात्र सर्व मोकाट…. असं कस एक स्त्री जर आपला पत्नीधर्म निभावत असेल तर नवऱ्याने सुद्धा त्याचा पतीधर्म पाळला पाहिजे….
तिला हवं ते काम करण्यात तिला प्रोत्साहन दिले पाहिजे, तिच्या आवडीनिवडीचा सन्मान केला पाहिजे. जर पुरुषाला आपल्या पत्नीकडून काही अपेक्षा असतील तसेच तिला सुद्धा पुरुषांकडून काही अपेक्षा असणे साहजिकच आहे .
शेवटी एकच की, तिच्या इच्छाआकांक्षाचा आदर होणे महत्वाचे!!

जगू द्या हो तिच्या इच्छेप्रमाणे
तिलाही जगण्याचे स्वातंत्र्य आहे!!
घेऊ द्या तिला उंच गगनभरारी
जर तिच्या पंखात उडण्याचे सामर्थ्य आहे!!

 

सौ. पुजा विजय गंगावणे, नागपूर

Social Media