एकनिष्ठांच्या साक्षीने विचारतो आता गद्दारांचे कसे होणार? शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे व्यासपिठावरून नतमस्तक होत उपस्थितांना अभिवादन ! 

मुंबई  :   शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला आज स्वत:हून आलेल्या निष्ठावंताच्या दर्शनाने मी भावूक झालो आहे, मला बंडखोरांच्या बंडानंतर लोक विचारत होते शिवसेनेचे कसे होणार? त्यांना मी आता या माझ्या एकनिष्ठांच्या साक्षीने विचारतो आता गद्दारांचे कसे होणार? असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यानी व्यासपिठावरून नतमस्तक होत उपस्थितांना अभिवादन केले. देवेंद्र फडणवीसांपासून मुख्यमंत्र्यापर्यात आणि पंतप्रधान मोदी पासून अमित शहा पर्यत सा-या विरोधकांचा त्यानी नेहमीच्या शैलीत समाचार घेत ठाकरी भाषेत ओरखाडे काढले. तुम्ही आता मंत्री असला हे पद कायमचे नाही मात्र तुम्हाला कायम गद्दार म्हणुनच ओळखले जाणार आहे असे त्यांनी बंडखोरांना निक्षून सांगितले.

शिवाजी पार्कच्या मैदानावर आणि मैदानाबाहेर भगव्या झेंड्याची गर्दी झाली आहे ही भाड्याची गर्दी नाही असे सांगत उध्दव ठाकरे यांनी त्याच्या भाषणाची सुरुवात सात वाजून पंचावन मिनिटानी केली. ते म्हणाले की मी मुख्यमंत्री झालो त्याच वेळी या मैदानावर अशी गर्दी होती आणि मी नतमस्तक झालो होतो तसेच आज माझा कंठ दाटून आला आहे मला शब्द सुचत नाहीत असे ते म्हणाले. डॉक्टरांची मनाई नही मला तुमच्या समोर वाकून नतमस्तक होण्याची इच्छा झाली आणि मी फक्त तुमच्या समोरच वाकलो आहे. कारण ही मला बाळासाहेबांची मिळालेली सगळ्यात मोठी कमाई मी आज अनुभवतो आहे असे ते म्हणाले.

उध्दव ठाकरे म्हणाले की या दसरा मेळाव्यात आपण दहा तोंडाचा रावण दहन नेहमी करतो मात्र यावेळी रावणाची तोंड वाढली आहेत पन्नास डोक्यांचा आणि खोक्यांचा रावण आता आला आहे त्याचे दहन आपल्याला करायचे आहे (जोरदार प्रतिसाद)  ठाकरे म्हणाले की मी मुख्यमंत्री असताना जेंव्हा  आजारी होवून निचेष्ट पडलो होतो तेंव्हा ज्यांच्यावर पक्षांची आणि सरकारची जबाबदारी विश्वासाने दिली होती ते कटप्पा होते. होय कट करणारे आप्पा त्यांनी डाव साधला होता. पण हा उध्दव ठाकरे नाही  उध्दव बाळासाहेब ठाकरे आहे असे सांगत ते म्हणाले की सर्वकाही ज्यांना दिले ते तिकडे का गेले ते सांगणारच आहे पण ज्यांना कधीच काही दिले नाही ते मला सोडून गेले नाहीत हे खरे माझे शिवसैनिक आहेत ही माझी कवचकुंडले आहेत. ही शिवसेना एकट्यादुकट्याची नाही हे आज तुम्ही दाखवून दिले आहे असे ते म्हणाले. ते म्हणाले की मला शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदावरून यांना खेचायचे आहे पण मी तुमच्यातला एकनिष्ठ सैनिक सांगेल तेंव्हा लगेच बाजुला जायला तयार आहे गद्दारांच्या सांगण्यावरून नाही. ते म्हणाले की बाप मंत्री कार्टे खासदार आणि हे मला सांगणार तुम्ही वारसदार नाही त्यांची लायकी तरी आहे का शिवसेनापक्षप्रमुख होण्याची असा सवाल त्यानी केला. त्यांना इतकेच आहे तर त्यांनी त्यांच्या वडीलांचे नाव घ्यावेअणि मते मागावी माझ्या वडिलांचे नाव का घेता बाप चोरणारी अवलादीने मला पक्ष कसा चालवायचा ते शिकवायची गरज नाही. असे ते म्ह्णाले.

उध्दव ठाकरे म्हणले की, मी माझ्या आई वडीलांची शपथ घेवून सांगतो की अमित शहांनी मला पन्नास पन्नास टक्के पद आणि सत्ता देण्याचे वचन दिले होते ते त्यांनी पाऴे नाही आणि खंजीर खुपसला त्यामुळे मला त्यंना ध डा शिकवण्यासाठी महाविकास आघाडी करावी लागली. पण त्यावेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यासोबत हेच मंत्री झाले होते ना तेंव्हा का नाही यांना हिंदुत्व आठवले? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्याचे नाव न घेता केला. ठाकरे म्हणाले की, शिवसेना प्रमुख आणि आनंद दिघे यांचे नाव आता हे घेत आहेत मग वीस वर्षापासून का नाही घेतले? कारण आज ते दोघेही हयात नाहीत ते बोलू शकत नाहीत?

उध्दव ठाकरे म्हणाले की गृहमंत्री फडणवीस यानी बोलायची पंचायत करून ठेवली आहे. कायद्याला धरून बोला म्हणाले आहेत. पण त्यांना मला विचारायचे आहे की त्यांना कायदा कळतो हा टोमणा नाही पण आम्हाला सुध्दा कळतोच. ते मनावर दगड ठेवून उपमुख्यमंत्री झाले आहेत हा टोमणा नाही आहे का हा टोमणा? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थिताना विचारला त्यावेळी नाही नाही असे आवाज आले. ठाकरे म्हणाले की, आम्ही कायदे पाळतो मात्र तुम्ही कुत्रे पाळाता. या दादर मध्ये एका आमदाराने गोळिबार केला एका बंडखाराने चूनचून के बदला म्हटले, त्यावेळी तुमचा कायदा कुठे गेला होता. पोलीसानी आमव्या मढवी आणि असंख्य कार्यकर्त्यावर आकासाने तडीपारीच्या कारवाया सुरू केल्या आहेत तर तुमचा कायदा काय करत आहे? ग्रामपंचायत निवडणुकांमध्येही खोट्या केसेसमध्ये अडकवण्याच्या धमक्या देवून जागा पळवण्याचे प्रकार झाले त्यावेळी कायदा काय करत होता? असे ते म्हणाले

उध्दव ठाकरे म्हणाले की, शिवसैनिकांवर अन्याय कराल तर आम्हालाही कायदा कळतो हे ध्यानात ठेवा आम्ही सहन करणार नाही. ते म्हणाले की शिवसेनेला कायदा आणि हिंदुत्व तुम्ही शिकवण्याची गरज नाही. नवाज शरिफच्या वाढ दिवसांला बिब बुलाये मेहमान म्हणून जाणारे मेहबुबा सोबत सत्तेत बसणारे आम्हाला हिंदुत्व सोडले का म्हणतात? असे म्हणत त्यांनी रा स्व संघाचे सरकार्यवाग दत्तात्रय होसबाळे यांचे अभिनंदन केले ते म्हणाले की  सर्वाच्या साक्षीने त्यांचे अभिनंदन करतो कारण त्यांनी केंद्र सरकारच्या चूकांवर बोट ठेवले आहे. त्यांनी धाडस केले त्यांचे अभिनंदन केले पाहिजे असे ते म्हणाले  उध्दव ठाकरे म्हणाले की अमित शहा म्हणे आम्हाला जमिन दाखविणार आहेत हो नक्कीच दाखवा आम्हाला देखील पाकव्याप्त काश्मिरमध्ये गेलेली आपली जमिन मिळालेली पहायची आहे तुम्ही आठवर्ष सत्तेत आहात तर दाखवाच  असे आव्हान त्यांनी दिले. तसे केले तर त्या गद्दारांना बाजुला करून आम्ही तुम्हाला डोक्यावर घेवून नाचू  आता त्यांच्या सरकारचे शंभर दिवस होत आहेत त्यातील ९० दिवस दिल्लीत मुजरा करण्यात आणि दहा गल्लीत गोंधळ करण्यात गेले असा टोला त्यानी राज्य सरकारला लावला
ठाकरे म्हणाले की, देश आता हुकूमशाही कडे निघाला आहे हे नड्डा जे बोल ले त्यावरून दिसत आहे त्यामुळे देशप्रेमींना एकत्र येण्याची वेळि आली आहे तरच हा देश वाचणार आहे. ते म्हणाले की मोहन भागवत मशिदीत जावून आले, मशिदीत? त्यांनी पण हिंदुत्व सोडले का ? नाही त्यानी संवादासाठी हात पुढे केला आहे जे देशप्रेमी मुस्लिम आहेत ते आमचेच आहेत ही भुमिका बाळासाहेबांनी आणि शिवरांयानी मांडली आहे तीच आमची भुमिका आहे. पण आम्ही कॉंग्रेस सोबत गेलो म्हणून हे म्हणतात हिंदुत्व सोडले? आम्ही तर भागवत यांना  राष्ट्रपती करण्याची मागणी केली होती आता त्यांना राष्ट्रपित्याची उपमा मिळाली आहे. ते म्हणाले की मी मोहन  भागवत यांच्या दसरा मेळाव्यातील महिला शक्तीबाबतच्या वक्तव्यांचे स्वागत करतो पण मग अंकिता भांडारीआणि बिल्किस बानूला तुमच्या राज्यात न्याय मिळणार आहे की नाही हे देखील सांगायला हवे असे ते म्हणाले.

ठाकरे म्हणाले की सध्या तोतयाचे बंड सुरू आहे, किंवा तो मी नव्हेच चा वेगळा प्रयोग हो तो मीच सुरू आहे. त्यांना शिवसेना धनुष्यबाण हवे आहे बाळासाहेब आणि शिवसेनाप्रमुखपदही हवे आहे हे मैदानही हवे होते पण त्यांना नाही मिळाले ते म्हणातात की लक्ष दिले असते तर मिलाळेच नसते  काय बापाचा माल वाटला का? असा सवाल त्यानी केली. ठाकरे म्हणाले की मी महाविकास आघाडीत सन्मानाने गेलो आणि राहिलो आणि त्यांच्यासोबतच औरंगाबादचे संभाजीनगर आणि धाराशिव करून दाखवले कर्जमुक्ती केली आणि कोविडमध्ये राज्याला गौरवा वाढेल असे काम कैले त्यावेळी हे कुठे होते. अजित पवारा यानी माझा माईक कधी हिसकावला नाही कारण त्यांच्याकडे ते संस्कार आहेत असा टोलाही त्यानी हाणला. ही बांडगुळे आहेत त्यांचा उद्याचा काळ संपलेला आहे पण शिवसेना वृक्ष आहे त्याची मुळे जमिनीतआहेत ती संपणार नाही असे ते म्हणाले माझा मार्ग कठीण निखा-यांचा आहे  काट्याचा आहे मला तुमची अशीच साथ देणार का असा सवाल त्यानी केला त्यानंतर ते म्हणाले मी तुम्हाला पुन्हा सेनेची सत्ता आणून दाखवतो त्यासाठी लडावे लागेल सज्ज रहा प्रत्येक निवडणुकीत यांना मात द्यावी लागेल असे ते म्हणाले त्यानंतर हात  उंचावत उपस्थितांना त्यांनी एकनिष्टेची साद घातली. रावण दहनानंतर मेळावा संपन्न झाला

Social Media