ज्यांच्या पक्षांची अजून नोंदणी नाही त्यांनी दहा कोटी मेळाव्यावर कोणत्या खात्यातून खर्च केले ? 

मुंबई  : ज्यांच्या पक्षांची अजून नोंदणी नाही त्यांनी दहा कोटी मेळाव्यावर कोण्ताय खात्यातून खर्च केले याची आता इडी आयटी का चौकशी करत नाही असा सवाल शिवसेना उपनेत्या सुशमा अंधारे(Sushma Darkness) यांनी केला आहे. त्या म्हणाल्या की इडीचे अधिकारी यांची आता चौकशी का करत नाही म्हणून किरितभाऊ सुध्दा विचारत नाहीत. कायद्याची चौकट तुम्ही आम्हाला शिकवू नका कारण तो कायदाच आमच्या बापाने लिहिला आहेअसे त्यानी गृहमंत्री फडणवीसांना उत्तर देताना सांगितले.

शिवसेना दसरा मेळाव्यात यंदा विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते भास्कर जाधव आमदार नितीन देशमुख आणि उपनेत्या सुषमा अंधारे याची पहिल्यादांच दमदार भाषणे झाली त्यातही अंधारे यांनी त्यांच्या वेगळ्या शैलीतील भाषणातून विरोधकाना आव्हान देत आम्ही पक्षप्रमुख ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे आहोत असा निर्धार व्यक्त करत रणरागिणीचा आवाज दाखवून दिला. तर  भास्कर जाधव यानी नारायण राणे, आणि रामदास कदम यांचा समाचार घेतला. अंबादास दानवे यानी राज्य सरकारच्या घोषणांची अतिवृष्टी आणि अंमलबाजवणीचा दुष्काळ सुरू असून गेल्या तीन महिन्यात चारशे शेतक-यांनी आत्महत्या केल्याचे सांगत शिंदे सरकारवर टिका केली आहे.

मेळाव्याच्या सुरूवातीला माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचे भाषण झाले. त्यानी कोविड काळात मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यानी जगाला मार्गदर्शन व्हावे अस काम करून दाखविल्याचे सांगितले.  कोणाच्या मेळाव्याला गर्दी होणार या चर्चेवर टिका करताना भाड्याची गर्दी ही गर्दी असते आणि ज्याना कुठे जातो आहे तेच माहिती नाही अश्या दिशाभूल करून आण लेल्यंची गर्दी शिवतिर्थावर नाही अश्या शब्दात बंडखोरांच्या मेळाव्याचा समाचार घेतला.

आमदार नितीन देशमुख यानी सांगितले.की केवळ पन्नास खोक्यांसाठी पन्नास जण शिवसेना सोडून त्यांच्यासोबत गेलेआहेत जे फडणवीस पहाटेच्या वेळेस राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्यात अपयशी झाले होते. मात्र ज्या बाळासाहेबांची हयात घालवून शिवसेना मराठी माणसांसाठी उभी केली त्यांच्या पक्षाला संपविण्यासाठी ज्या लोकांनी सुपारी घेतलीआहे त्याची साथ आम्ही कदीच देणार नाही. आम्हाला पदे दिली त्या ठाकरेंच्या घराण्याशी बेईमानी करणारे आम्ही नाही असे ते म्हणाले.

अंबादास दानवे म्हणाले की,  शिवसेना प्रायवेट लिमीटेड कंपनी असल्याची टिका केली जात पण माझ्यासारखा खेड्यातून आलेला माणूस या मंचावर भाषण करताना दिसत आहे त्यातच ही प्रायवेट लिमिटेड कंपनी आहे की नाही याचे उत्तर आहे ते म्हणाले की गेल्या चार महिन्यात मी १८ जिल्ह्यात जावून आलो या सरकारने अतिवृष्टीची मदत देण्याची घोषणा केली महिना झाला तरी अद्याप १ रुपयाची मदत शेतक-याना दिली नाही त्यामुळे केवळ घोषणांची अतिवृष्टी आणि मदतीच्या अंमलबजावणीचा दुष्काळ अशी या सरकारची गत आहे. बंडखोर गटाचे आमदार घमक्या देत आहेत गोळिबार करत आहेत आणि गृहमंत्री आम्हालाच कायद्याची भाषा सांगत आहेत असे सांगून दानवे म्हणाले की, उद्या सत्ता बदल ल्यानंतर पोलीसांच्या मदतीने आम्हाला देखील कही करता येते हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे. ते म्हणाले की अब्दुल सत्तार कट्टर हिंदुत्व वादी झाले आहेत त्यांच्या मतदारसंघात शिवनी ग्रामपंचायत मध्ये औरंगजेब चौक नावाचा चौक सध्या नुकताच ठराव करून मंजूर करण्यात आला आहे. दिवार मधील शेर मध्ये जसे  संवाद आहे तसे मी सांगतो असे म्हणत ते म्हणाले की आमच्या कडे पन्नास खोके आहेत ५० आमदार आहेत महाशक्ती आहे  तुमच्या कडे काय आहे तर मी सांगेन माझ्याकडे उध्दव बालासाहेब ठाकरे आहेत. (मेरे पास मा है) असे ते म्हणाले

सुभाष देसाई यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात मराठी भाषा आणिउद्योगासाठी कसे भरीव काम केले मात्र गेल्या ९० दिवसांत नव्या सरकारने त्यात कसे काहीच कैल नाही त्यावर टीका केली ते म्हणाले की, मुंबई महापालिकेची फडणवीस यांना चौकशी करायची आहे  खुशाल करा पण त्यासोबत नागपूरच्या महापालिकेत भाजपच्या लोकांनी काय भ्रष्टाचार केले आहेत त्याची देखील चौकशी करा असे आव्हान देत त्यानी काही योजनांच्या भ्रष्टाचाराचा तपशील दिला. मुंबईची शक्ती महाराष्ट्रापासुन तोडण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत त्यानी अनेक संस्था प्रकल्प गुजरातला पळविण्यात येत अशल्याचे सांगितले.

सुषमा अंधारे म्हणाल्या की मी या हिंदुत्व वाद्यांच्या व्यासपिठावर कशी बोलणार म्हणून शंका घेण्यात आल्या आहेत तर त्यांना मी सांगेन की शिवसेना माझी ई आहे आणि आईला विसरणारी गद्दार मी नाही. सध्या इवेंट करणा-या पावसकर राणे कदम यांच्यासह बंडखोर गटाच्या नेत्यांची नावे घेत त्या म्हणाल्या की, त्यानी आम्हाला हिंदुत्ब शिकवण्याची गरज नाही. कळसुत्री बाहुल्यांचा खेळ करणा-या फडणवीसांनी तर हिंदुत्व बोलूच नये कारण हिंदूत्वाने व्देष करायला शिकवले नाही तर पसायदानात ज्ञानेश्वरानी जे सांगितले ते हिंदुत्व आहे. म्हणून आम्ही छातीठोकपणे या शिवसेनेत आहोत संभाजी ब्रिगेड सह दलित मुस्लिम अठरापगड जाती  या शिवसेनेसोबत येत आहे याची खद खद या सा-याना आहे म्हणून ते अस्वस्थ आहेत असे त्या म्हणाल्या. अंधारे म्हणाल्या की आता त्यांच्या बुलढाणा यवतमाळ कल्याणसारख्या खासदारांच्या जागा देखील भाजप गिळायला निघालाआहे मग त्यानी जर शिवसेना वाचवायला गेलो म्हटलेअसेल तर मिंधे सेना म्हणून  भाजपची सोबत करत राहू नये नडडा शिवसेना संपविण्याची भाषा करतात तेंव्हा यांच्या तोंडाला कुलूपे का लागली होती असा सवाल त्यांनी केला. त्या म्हणाल्या आपला एक भाऊ रमेश लटके गेले त्यांची विधवा पत्नी निवडणूक लढत असताना हे शिवसेना वाचवायला गेलेले त्यांच्या समोर भाजपला पुढे करत काय करत आहेत असा सवाल त्यांनी केला. संजय राऊतावर आकसाने कारवाई केली मात्र शिवसेना त्याने संपणार नाही कारण हा पक्ष केवळ पक्ष नाही जा विचार आहे तो संपणार नाही ज्यांच्या पक्षांची अजून नोंदणी नाही त्यांनी दहा कोटी मेळाव्यावर कोण्ताय खात्यातून खर्च केले याची आता इडी आयटी का चौकशी करत नाही असा सवाल करत त्या म्हणाल्या की इडीचे अधिकारी  यांची आता चौकशी का करत नाही म्हणून किरितभाऊ सुध्दा विचारत नाहीत. कायद्याची चौकट तुम्ही आम्हाला शिकवू नका कारण तो कायदाच आमच्या बापाने लिहिला आहेअसे त्यानी गृहमंत्री फडणवीसांना उत्तर देताना सांगितले.

भास्कर जाधव म्हणाले की, एका सभ्य सुस्कृंत मुख्यमंत्र्याना पदावरून खेचून जे मुख्यमंत्री झाले त्यानी दुसरा मेळावा घेतला तरी तो  डुप्लिकेट मेळावा आहे ति कायम होणार नाही हा मेळावा ५६ वर्ष सुरू आहे असे ते म्हणाले. हे मैदान मिळू नये म्हणून त्यंचा प्रयत्न होता पण न्यायदेवेतेने आम्हाला न्याय दिला असे ते म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गद्दार गेले  तर त्यांची ढुंगणे ते शेकवतील त्यानंतर जाताना त्यांना मासाहेब भेटल्या तर ते तक्रार करतील तेंव्हा त्यंना हळद लावायला सांगून त्या माऊली म्हणतील की तुम्ही काहीतरी चूक केल्याशिवाय साहेब तुम्हाला अशी शिक्षा करणार नाहीत असा काल्पनिक किसाही त्यानी सांगितले. राज्यात सध्या शिंदेशाही नसून मोगलशाही गुलामगिरी सुरू आहे  सा घणाघातही त्यानी केला. इनकम  टँक्समध्ये शिपाई असणारे राणे आणि काहीच नसलेले कदम यांना पदे आणि नाव मिळवून दिले ती शिवसेना आहे मात्र त्यांची नावे आजच्या दिवशी घेवून मी वेऴ घेत नाही असे ते म्हणाले. हा स्वत:ची भाजी भाकरी घेवून येणा-या खुद्दारांचा मेळावा आहेआणि तिकडे पंचतारांकीत गद्दारांचा इवेंट आहे  असे त्यानी सांगितले.

Social Media