मुंबई : दसऱ्याच्या निमीत्ताने मुंबईत गुरूवारी शिवसेनेचा शिवतीर्थावर तर बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या (Chief Minister Eknath Shinde)बंडखोर गटाचा दसरा मेळावा पार पडला. दोन्ही मेळाव्यात कार्यकर्ते उत्साह वाढविण्यासाठी अरे हा आवाज कुणाचा ? शिवसेनेचा अश्या ल लका-या देतात मात्र यावेळी भाषणा दरम्यान उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय जुगलबंदीत आवाज कोणाचा? याची माहिती आता मुंबई पोलीस आणि आवाज फाउंडेशन तर्फे जारी करण्यात आली आहे.
या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपेक्षा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेचा आवाज सर्वात जास्त होता, पोलीसांच्या पाहणीनुसारही ठाकरेंच्या शिवतीर्थावरील सभेत आवाजाची पातळी जास्त होती. असाच निष्कर्ष आवाज फाऊंडेशननेही काढला असून अहवाल जारी केला आहे. आवाज फाऊंडेशनच्या मोजणीत शिवाजी पार्कच्या मेळाव्यात १०१.६ डेसिबल इतका आवाज होता. तर, वांद्र्यातील बीकेसीत एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात ८८ डेसिबल इतका आवाज नोंदवला गेला.
नेत्यांच्या भाषणांनुसार आवाजाची पातळी वेगवेगळी होती ती उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यात किशोरी पेडणेकर यांच्या भाषणात सर्वाधिक नोंदवली गेली. त्यांच्या भाषणावेळी ९७ डेसिबलपर्यंत आवाज होता. तर एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात सर्वाधिक आवाज खासदार धैर्यशील माने ८८.५ डेसिबल नोंदवला गेला. अशी माहिती आवाज फाउंडेशनच्या अहवालातून समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे भाषण करताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाजाची पातळी ही ८८.४ डेसिबल होती तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाजाची पातळी मात्र त्यांच्यापेक्षा थोडी जास्त ८९.६ डेसिबल नोंदवण्यात आली आहे