राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा रुग्णालयात घेतली अपघात ग्रस्तांची भेट; घटनास्थळाचीही केली पाहणी

नाशिक :  नाशिक औरंगाबाद(Nashik Aurangabad) रस्त्यावर नाशिक शहरातील मिरची हॉटेल परिसरात आज पहाटे बस आणि ट्रेलरमध्ये भीषण अपघात(Terrible accident) झाला. या अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर इतर जखमी प्रवाशांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघातग्रस्तांची राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात भेट घेत घेतली. यावेळी छगन भुजबळ(Chagan Bhujbal) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्याशी या हृदयद्रावक अपघाताबाबत फोनद्वारे चर्चा केली.

नांदूरनाका परिसरात झालेल्या अपघाताची माहिती मिळताच छगन भुजबळ यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात धाव घेत अपघात ग्रस्तांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी गंगाथरण डी., जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्याकडून जखमी प्रवाशांबाबत माहिती घेतली. तसेच अपघात ग्रस्त रुग्णांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या.

त्यानंतर छगन भुजबळ यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करत अपघाताची तीव्रता जाणून घेतली. यावेळी उपस्थित पोलीस व मनपा अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर आदी उपस्थित होते.

Social Media