मुंबई : पोलीस बॉइज संघटना भंडाराकडून डायरेक्ट मंत्रालय मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री यांना निवेदन दिले.
पोलिस बॉइज असोसिएशन भंडारा कडून दिनांक 19/10/22 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पोलिसांच्या न्याय व हक्काचे प्रश्न मांडण्यासाठी पोलीस बॉइज असोसिएशन भंडाराचे शिष्टमंडळ
मंत्रालय मुंबई येथे गेले असता समक्षरीत्या निवेदन देऊन आपल्या पोलीस बांधवांविषयीच्या अडी-अडचणी सांगण्यात आल्या.
तेव्हा पहीली मागणी सांगताना ‘पोलिसांच्या 5 दिवसाचा आठवडा वगळता त्या 52 शनिवार च्या सुट्यांचे पैसे एकत्रितपणे दिवाळीत देण्यात यावे’ असे आदेश पारीत झाले पाहिजे. अशी मागणी किंवा कोवीड -19 सारख्या महामारी मध्ये महाराष्ट्र पोलिसांनी ‘Front line worrier’ म्हणून स्वतःच्या जीवाची व आपल्या परिवाराची पर्वा न करता कर्तव्य बजाविले असताना सुद्धा पोलिसांना वगळून तुम्ही सर्वांना दिवाळी बोनस देत आहात. मग पोलिसांना का नाही ????
हा प्रश्न साहेबांना विचारण्यात आला. तोच प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भंडारा जिल्ह्यात पहिल्यांदा आले असता तेंव्हासुद्धा हा विषय सांगण्यात आला. तेव्हा फडणवीस म्हणाले की, बघतो आणि करतो असे बोलून आमच्या मागणीला व निवेदनाला प्रतिसाद दिला.
याच प्रकारच्या अश्या पुन्हा 14 मागण्या आम्ही निवेदनात दिल्या आहेत.. मी महाराष्ट्र पोलिसांना ग्वाही देतो की पोलीस बॉइज असोसिएशन भंडारा महाराष्ट्र पोलिसांच्या न्याय व हक्कांकरीता शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहीण असे पोलीस बॉइज असोसिएशन भंडारा जिल्हा अध्यक्ष जैराम बावने यांनी सांगितले.