अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक : शिवसेना (ठाकरे पक्ष) जास्तीचा भाव खावू नये यासाठी माघार घेतली तरी लटके यांना एकूण मतदानाच्या ७६ टक्के मते!

मुंबई : मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे(Uddhav Balasaheb Thackeray) पक्ष जास्तीचा भाव खावून जावू नये यासाठी ही निवडणूक एकतर्फी करण्याच्या भाजप – बंडखोर पक्षांच्या धोरणानंतरही लटके यांनी एकूण मतदानाच्या ७६ टक्के मते घेतली आहेत. हे मतदार नेमके कोण? याचा निवडणूक निकालानंतर अभ्यास करून मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतदानाची रणनिती सर्वच राजकीय पक्ष ठरविताना दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात या निवडणुकीत झालेला नोटा चा प्रयोग हे भाजपचे राजकारण होते की, भाजप कॉंग्रेस सह शिवसेनेच्या अंतर्गत नाराज घटकांची चेतावनी होती याचा देखील अभ्यास केला जात आहे.

हा निकाल अपेक्षीत होता त्यानुसार लागल्यानंतर शिवसेना (ठाकरे) पक्षाला हायसे वाटले तर भाजप आणि स्थानिक कॉंग्रेसच्या गोटात महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने गणिते समिकरणे काय असावीत याचे आकलन करण्यास सुरूवात झाली आहे. याबाबत कानोसा घेतला असता स्थानिक नेते आणि कार्यकर्ते ज्या खाजगित भावना व्यक्त करत आहेत त्या बोलक्या आहेत. अंधेरी पोटनिवडणुकीचा निकाल दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांच्या बाजूने लागल्याने तूर्तास ही जागा राखण्यात शिवसेना (ठाकरे) यशस्वी झाले आहेत. मात्र रमेश लटके आज हयात असते तर ते एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्यासोबत असते असा दावा शिंदे समर्थक नेते आणि कार्यकर्ते करताना दिसत आहेत.

या निवडणूकीत मतदानाची टक्केवारी घसरल्याचे कारण काय असावे याबाबत स्थानिक सर्वपक्षीय कार्यकर्त्याची मते वेगवेगळी आहेत. भाजपच्या बहुसंख्य कार्यकर्ते आणि स्थानिक नेते यांनी मुरजी पटेल यांनी निवडणुकीत माघार घेतल्यानंतर लक्ष काढून घेतल्याने मतदानाच्या शेवटच्या काही तासात मतदरांना जसे बाहेर काढले जाते तसे काढण्यात आले नसल्याचे कारण या कार्यकर्त्यानी दिले आहे. तर मोठ्या प्रमाणात नोटाचा प्रयोग होण्यामागे भाजपच्या नेत्यांनी आयत्यावेळी गोंधळ घालून जी माघार घेण्यास लावली त्याबाबतची नाराजी व्यक्त करण्याचा प्रकार होता असे भाजप कार्यकर्ते सांगत आहेत. नेमके त्यातील काही जण सांगतात की, कॉंग्रेसच्या परंपरागत मतदारसंघात यावेळी भाजपला जागा जिंकण्याची संधी होती ती आयत्यावेळी महिनाभरापासून उमेदवार त्याचे कार्यकर्ते कामाला लागल्यानंतर त्यांनी खर्च केल्यानंतर वाया गेली त्याचा निषेध व्यक्त करत पक्षनेतृत्वाला संदेश देण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला.

तर काही भाजप कार्यकर्ते आणखी वेगळे कारण देतात त्यांनी सांगितले की, कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांना पुन्हा लटके यांच्यानंतर या परंपरागत कॉंग्रेसच्या मतदारसंघात आपली जागा पटकावायची होती, मात्र वरिष्ठ नेत्यांनी शिवसेनेसोबत फरफट त जाण्याचा निर्णय घेतल्याने नाराज कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी (यात खासकरून संजय निरूपम समर्थकांचा भराणा आहे) नोटा बटन दाबून शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या निर्णयावर नापसंती व्यक्त केली आहे.

भारतीय जनता पक्षाकडून या निकालाच्या फेरीनिहाय आकडेवारीचा अभ्यास केला जात असून उध्दव ठाकरे यांच्या पक्षाच्या उमेदवाराला नेमेके कोणत्या    मतदारांचा पाठिंबा मिळाला आहे याचा आढावा घेतला जात आहे. यावरून मुंबईभर मतदारांचा कल नेमका कोणत्या घटकांचा कुणाकडे आहे हे समजण्यास मदत होणार असून त्यानुसार भाजपला मुंबईत महापालिका निवडणुकांची रण निती आखायला मदत होणार आहे असे या सूत्रांनी स्पष्ट केले. प्राथमिक माहितीनुसार नोटाचा प्रयोग कोणत्या प्रभागात जास्त झाला याची माहिती घेतली जात आहे. त्या शिवाय शिवसेनेला मुस्लिम ख्रिश्चन मराठी अमराठी महिला पुरूष यांच्या कडून किती मते कोणत्या भागात मिळाली याचा सुक्ष्म अभ्यास केला जात आहे.

शिवसेना(Shiv Sena) (ठाकरे ) पक्षाच्या कार्यकर्त्यानी देखील नोटाचा प्रयोग भाजपच्या  उमेदवाराच्या निकटवर्तुळातील मतदारांकडून जाणिवपूर्वक करून घेण्यात आला असून याबाबत पुराव्या सह निवडणूक आयोगाकडे तक्रार पक्षाने दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेनेच्या गोटातील माहिती नुसार पटेल यांनी भाजपविरोधात २०१९मध्ये बंडखोरी करत उमेदवारी केली होती. मात्र त्यामुळे यावेळी त्यांना उमेदवारी देवून संधी देण्यात आली तरी नंतर माघार घ्यायला भाग पाडल्याने त्यांच्या बंडखोर कार्यकर्त्यानी नोटची ही मोहिम चालवून पक्षाच्या नेत्यांविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

भाजपने माघार घेतल्यानंतर त्यांच्या पक्षाकडून निवडणुकीत स्वारस्य दाखविण्यात आले नाही पर्यायाने त्याचे मतदार मतदानाला  आले नाहीत त्यामुळे दहा ते पंधरा टक्के मतदान कमी झाले, या शिवाय घरोघरी जावून मतदानाचा प्रयोग झाल्याने ज्येष्ठ नागरीक  दिव्यांग व्यक्तीना घरीच मतदान करता आले त्यामुळे  मतदान केंद्रावर गर्दी जाणवली नाही असे सांगण्यात येत आहे. याशिवाय लटके यांना मिळालेली ६ ६५३० मते म्हणजे एकूण मतदानाच्या ७६ टक्के मतदार केवळ त्यानाच मत देण्यासाठी बाहेर पडल्याचे दिसत आहे. शिवसेनेकडून सांगण्यात आले की लटके ज्यावेळी २०१४मध्ये सर्व पक्ष एकटे लढले त्यावेळी भाजपच्या सुनिल यादव यांच्या विरोधात लढले होते. त्यावेळी शिवसेनेची टक्केवारी ३४. ५ टक्के तर भाजपची ३०. ९७ होती. याची बेरीज केली तर ६५ टक्के मते यावेळी लटके यांना मिळाली आहेत त्याशिवाय  अधिकची ७ – ८ टक्के मते कॉंग्रस आणि अन्य पक्षांच्या पाठिंब्यामुळे वाढल्याचे दिसत आहे असे सांगण्यात आले. २०१९ मध्ये भाजप – सेना पुन्हा युती झाली तेंव्हा  रमेश लटके यांना ४२. ६७ टक्के मते होती त्या तुलनेत आता त्यांच्या पत्नीला मिळालेल्या ७६ टक्के मतदानाची तुलना केली तरी चित्र स्पष्ट होत असल्याचे शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितले. मुरजी पटेल यांना २०१९मध्ये भाजप बंडखोर उमेदवार म्हणून ३१. १४टक्के मते होती. तर कॉंग्रेस उमेदवाराला २० टक्के मते होती. ही आकडेवारी  जुळवली तरी लटके यांना ७६ टक्केपेक्षा जास्त मतदान झाले म्हणजे कसे एकतर्फी मतदान झाले  आहे ते स्पष्ट होते. त्यामुळे हे नेमके कुणाचे मतदान झाले याचा शोध घेत भाजप नेत्यांना अभ्यास करत महापालिका निवडणुकांमध्ये मुंबईभर शिवसेना याच प्रकारे मतदान घेईल तर काय होईल? याचा अंदाज आल्याचे सांगण्यात येत आहे, असे या शिवसेना सूत्रांचे मत आहे. म्हणून मुंबई भाजप अध्यक्ष शेलार यानी लटके यांच्या मतदानात भाजपने माघार घेत दिलेल्या पाठिंब्याचा वाटा आहे असे का म्हटले त्याचा उलगडा होत असल्याचे या सूत्रांनी सांगितले!


मंकी बात

Social Media