– ज्येष्ठ पत्रकार अजय वैद्य यांना जीवनगौरव पुरस्कार
मुंबई : मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने शुक्रवारी विविध पुरस्कार जाहिर केले. पुरस्कारांमध्ये राज्यस्तरीय उत्कृष्ठ पत्रकारीतेसाठी दैनिक पुण्यनगरीचे गडचिरोलीचे जिल्हा प्रतिनिधी अविनाश भांडेकर(Avinash Bhandekar), मुंबईचे प्रतिनिधी किशोर आपटे(Kishor Apte) यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. तर यंदाचा कृ.पां. सामक जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार आणि संघाचे माजी अध्यक्ष अजय वैद्य(Ajay Vaidya) यांना जाहिर करण्यात आला आहे.
पत्रकारिता क्षेत्रात राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणा-या पत्रकारांना मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने विविध पुरस्काराने गौरविण्यात येते. मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून सन २०२२ च्या विविध पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. या पुरस्कारांची घोषणा मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर (Mandar Parkar)आणि कार्यवाह प्रमोद डोईफोडे यांनी केली. राज्यस्तरीय इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधीसांठी देण्यात येणारा राज्यस्तरीय उत्कृष्ठ पत्रकारीता पुरस्कार साम वृत्तवाहिनीच्या ब्युरो चीफ रश्मी पुराणिक (Rashmi Puranik)यांना जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्कारासाठी पत्रकारांची निवड करण्यासाठी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने समिती नेमली होती. या समितीचे प्रमुख म्हणून ज्येष्ठ पत्रकार किरण नाईक यांच्यासह अनिकेत जोशी व सदस्य सचिव म्हणून मििंलद लिमये यांनी काम पाहिले.