मुंबई ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांना जीवे ठार मारण्याची धमकी आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी एका तरुणाला अटक करून मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे . राहुल तळेकर(Rahul Talekar) ( २३) असे या तरुणाचे नाव असून रात्री उशिरा त्याला पुण्यातील खराडी भागातून अटक करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
शुक्रवारी ३१ मार्च रोजी ५ वाजताच्या सुमारास उद्धव ठाकरे(Uddav Thakre) गटाचे खासदार संजय राऊत यांना मोबाईल मेसेजद्वारे जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली.
ही धमकी खतरनाक गँगस्टर लॉरेन्स(Gangster Lawrence) बिश्नोईच्या नावाने देण्यात आली.संजय राऊतांनी त्यांना आलेल्या धमकीप्रकरणी पोलिसांत रीतसर तक्रारही दाखल केली.
पोलिसांची तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली. याच दरम्यान पुणे पोलिसांनी राहुल तळेकर या तरुणाला रात्री उशिरा पुण्यातील खराडी भागातून अटक केली. राहुल याला पुढील तपासासाठी मुंबई गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे .
राहुलने लॉरेन्स बिश्नोई गॅंगचा व्हिडीओ बघून
ही धमकी दिल्याचे म्हटले जात असले तरी त्याचा या गॅंग शी कुठलाही संबंध नसल्याचे प्राथमिक तपासत समोर आले आहे.त्याच्या वर आजपर्यंत कुठलाही गुन्हा नसून ,
त्याने दारूच्या नशेत खासदार संजय राऊत यांना मोबाईल फोनवर हा धमकीचा मेसेज पाठवल्याची माहिती समोर आली आहे.
असे पोलिसांनी म्हटले आहे.