पोषक तत्वांनी समृद्ध असलेले पनीर आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचेसाठी देखील फायदेशीर!

आतापर्यंत तुम्ही पनीरपासून अनेक पदार्थ बनवले असतील परंतु याचा फेसपॅक तुम्ही कधी वापरून पाहिला आहे का? हे ऐकून तुम्हाला खूप विचित्र वाटेल परंतु एकदा वापरल्यानंतर याचा परिणाम दिसून येईल. चला तर मग जाणून घेऊयात याचा वापर कसा करावा.

१ स्ट्रॉबेरी-पनीर फेसमास्क (Strawberry-Cheese Face Mask)

 

फेसपॅक बनविण्यासाठी २ चमचे स्ट्रॉबेरीचा लगदा, १ चमचा पनीर, २ चमचे दही घ्या. त्यानंतर एका भांड्यात सर्व वस्तू चांगल्याप्रकारे मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहरा आणि मानेला लावा २० मिनिटांनी चेहरा आणि मान कोमट पाण्याने भिजलेल्या टॉवेलने पुसून काढा. पाच मिनिटांनी साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ करा. काही दिवसांमध्येच तुम्हाला फरक दिसून येईल.

 

२ पनीर-मध फेसपॅक (Cheese-Honey Face Mask)

 

हा फेसपॅक बनविण्यासाठी एक चमचा घरी बनविलेला पनीर , एक चमचा मध, एक चमचा लिंबाचा रस घ्या. त्यानंतर एका भांड्यात हे तिन्ही पदार्थ एकत्र करून हे मिश्रण चेहऱ्यावर चांगल्याप्रकारे लावा. काही दिवसांनी त्वचा चमकू लागेल.

 

३ पनीर-लिंबू फेसपॅक (Cheese-Lemon Face Mask)

 

हा फेसपॅक बनविण्यासाठी एक चमचा पनीर, अर्ध्या लिंबाचा रस घ्या. या दोन्ही गोष्टी चांगल्याप्रकारे एकत्र करा आणि पेस्ट तयार करून चेहरा आणि मानेला लावा हा मास्क १५ मिनिटे चेहऱ्याला तसाच ठेवा त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा. काही दिवसांमध्ये त्वचेवर चमक दिसू लागेल.पनीरचे फायदे (benefits of cheese)- १ पनीर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते हे फायबरने समृद्ध आहे, जे अन्न पचनास मदत करते.

२ पनीरमध्ये असलेले कॅल्शिअम हाडे मजबूत बनवते.

३ अभ्यासानुसार नियमित पनीरचे सेवन केल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो.

४ पनीरमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते त्यामुळे मधूमेहाने त्रस्त असलेल्या लोकांनी दररोज कच्चे पनीर खाल्ले पाहिजे.
टिप्स- नेहमी त्वरित तयार केलेल्या फेसपॅकचाच वापर करा.

Nutrient-rich cottage cheese is not only good for health, it is also unmatched for the skin

Social Media