देशात लोकशाही व्यवस्थांच्या नावाखाली सुरू असलेली टायटॅनिक (परिवारवादाची नौका) बुडविली जाणार?

किशोर  आपटे.,राजकीय विश्लेषक

 

गेल्या ७५ वर्षापासून कॉंग्रेस (Congress)पक्षासह सर्वच पक्षांचे परिवारवादाचे राजकारण सुरु होते, त्यातून देशाचे नुकसान झाल्याचे पहायला मिळाले आहे हे सत्य नाकारून चालणार नाही. मात्र त्यावर पर्याय असलेल्या नव्या राजकीय पर्यायाचा २०१४ पासूनचा प्रवास पाहिला तर ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ अशी स्थिती झाली आहे हे कुणीही मान्य करेल. आपला प्रवास टायटॅनिक (titanic)सारखा सुरू आहे ही लोकशाही व्यवस्थांच्या नावाखाली सुरू असलेली परिवारवादाची नौका(boat) बुडविली जाणार आहे, त्यामध्ये जुन्या स्वातंत्र्याच्या काळातील इतिहास तथाकथित निती मुल्यांसह, लोकशाही (Democracy)आणि समाजवादी रचना अस्तंगत होत आहेत.

Titanic
देशात लोकशाही व्यवस्थांच्या नावाखाली सुरू असलेली टायटँनिक (परिवारवादाची नौका) बुडविली जाणार?

महाराष्ट्राच्या(Maharashtra) राजकारणात जून २०२२ पासून मोठ्या प्रमाणात अघटीत सत्ताकारण सुरू आहे. त्यामागे केंद्रात सत्तेवर असलेल्या एका राजकीय पक्षांच्या मुख्य नेत्यांची  आसुरी सत्ताकांक्षा हेच आहे. मात्र संपूर्ण देशात २०२४पर्यंत हेच चित्र दिसणार आहे. कारण जनमानस कोणत्याही दिशेने असले तरी वाट्टेल ते करून सत्ता मिळायलाच हवी असे केवळ एका मतासाठी वाजपेयींच्या काळात सत्तेवर येवू न शकलेल्या या पक्षाचे सध्याचे धोरण आहे. या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी तर जाहीरपणे २०२४मध्ये देशातील सर्व पारिवारीक (कॉंग्रेस सह) राजकीय पक्ष(Political parties) संपतील आणि एकमेव राजकीय पक्ष शिल्लक राहील अशी घोषणाच करून टाकली आहे. ते  आठवले की हे समजायला सोपे जाणार आहे की शिवसेनेत सध्या ठाकरे एकाकी का झाले? आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार(Sharad Pawar) यांना पक्ष वाचवायचा की कुटुंब? या पेचात कसरत का करावी लागत आहे.

Titanic
देशात लोकशाही व्यवस्थांच्या नावाखाली सुरू असलेली टायटँनिक (परिवारवादाची नौका) बुडविली जाणार?

हे केवळ महाराष्ट्रातच सुरू आहे असे नाही तर तेलंगणात केसीआर यांच्या कन्येला इडीकडून अटक करण्याच्या माध्यमांतूनही सुरू आहे. उध्दव ठाकरे हे अनेकदा सांगतात किंवा कपील सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले तसे दु:ख म्हातारी मेल्याचे नाहीच काळ सोकावला जात आहे त्यासाठी न्यायालयाने याकडे दूरच्या भविष्याच्या लोकशाही मुल्यांच्या रक्षणाचा विचार करून पहायला हवे आहे असे सांगितले. पण तसे पाहिले जाईल का? याचे फार अचूक समाधानकारक उत्तर गेल्या दहा महिन्यात ना निवडणूक आयोगाकडून आले ना सर्वोच्च न्यायालयाकडून. कारण सध्या देशात जे वातावरण आहे त्यात असे पहिल्यांदाच होताना दिसत आहे, घटनात्मक , कायदेशीर वाटा पळवाटा आणि संविधनिक पदांवरच्या व्यक्तींच्या भुमिका संभ्रमित करणा-या आहेत की काय? अशी स्थिती दिसत आहे. त्यातही सर्वोच्च न्यायालयाकडून काही आशेचा किरण येईल या आशेवर सध्या सारेच चाचपडत आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेस (Nationalist Congress Party)पक्षात २मे पासून पाच मे पर्यंत जे काही घडले तो पवार यांच्या धुरंधर राजकारणाचा भाग होता? की त्यांच्या वाढत्या वयात, असहाय स्थितीत कुटूंब पक्ष आणि प्रतिष्ठा आणि वाचविण्याची धडपड करताना आपला देखील  उध्दव ठाकरे होवू नये यासाठीचा केविलवाणा अट्टाहास होता याचा निष्कर्ष आताच काढणे योग्य होणार नाही. सा-या माध्यमांतून मात्र जे विश्लेषण तथाकथित चाणक्यांच्या नजरेतून विश्लेषण पाहताना वाचताना मनोरंजन होत राहणार आहे हेच काय ते समाधान?

Titanic
देशात लोकशाही व्यवस्थांच्या नावाखाली सुरू असलेली टायटॅनिक (परिवारवादाची नौका) बुडविली जाणार?

परिवारवादाला विरोध असणा-या एका राजकीय उजव्या विचासरणीच्या माध्यमातून या देशाच्या अमृतकाल म्हटल्या जाणा-या वर्षात ७५ वर्षापासून चालत आलेल्या राजकीय लोकशाही मुल्य परंपरा मानबिंदूना पुसून टाकण्याची आसुरी ओढ सुरू  आहे. त्याचाच परिपाक एकनाथ शिंदे आणि त्यांचे बाशिंदे सूरत ते गुवाहाटी व्हाय गोवा मुंबईत परत येतात, आणि लढावू मराठी बाणा आहे असे सांगणा-या नेत्यांचे अवसान गळून त्यांच्या शेळ्या झाल्याचे पहायला मिळते. मात्र त्याबद्दल कुणाही चाणाक्यांच्या विश्लेषणातच सुध्दा काहीच उमटत नाही. वाळवंटात आलेल्या वादळात शहामृगाने जसे रेतीत डोके खूपसून स्वत:चा बचाव केल्याचे समाधान मानावे तसे या सा-या तथाकथित यु ट्यूबर, राजकीय विश्लेषकांची भुमिका असावी काय? असा प्रश्न पडतो. परिवारवादी राजकीय पक्ष गांधी नेहरू घराण्याची कॉंग्रेस, महाराष्ट्रात एकमेव पवारांच्या रुपाने बहरलेली राष्ट्रवादी, किंवा ठाक-यांच्या घरातील शिवसेना या परिवारीक राजकीय पक्षांची सद्दी २०२४ मध्ये संपविण्याचा कार्यक्रम सुरू आहे. तसाच तो उत्तर प्रदेशात मुलायम अखिलेश किंवा मायावतींबाबत, तामिळनाडूत करूणानिधी आणि स्टालिन यांच्या बाबत, उडिशा मध्ये पटनायक किंवा तेलंगणा मध्ये केसेीआर सोबत सुरू आहे.पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या विरोधात पहायला मिळाला. जम्मू- काश्मिरमध्ये तर अब्दुल्लांचे तसचे मुफ्तींचे राजकारण संपल्यात जमा आहे. पंजाबमध्ये अकालीची स्थिती केजरीवालांचा विजय झाल्यावर संपल्यासारखी करण्यात आली आहे. आंध्रमध्ये सध्या वायएसआर यांचे सुपूत्र सर्वसत्ताधिश पक्षाचे मांडलिक आहेत म्हणून तूर्तास सुपात आहेत मात्र त्याना जा जात्यात जायला वेळ लागणार नाही. एकूणच देशात चीन प्रमाणे एकाच पक्षाचे धोरण आणि तोरण आणायचा प्रयत्न केला जात आहे. याकडे ‘उघडा डोळे पहा निट’ म्हणत कुणी पहात किंवा बोलत नाहीत. या देशाच्या ७५ वर्षापासून सुरू असलेल्या संविधानिक राजकीय लोकशाही परंपराचा –हास घडविला जात आहे. त्यावर भाष्य करून त्यासाठी जनमानसाला जाग आणायची किंवा किमान जाणिव करून द्यायची जबाबदारी कुणीच घेताना दिसत नाही.

Nationalist Congress Party
देशात लोकशाही व्यवस्थांच्या नावाखाली सुरू असलेली टायटॅनिक (परिवारवादाची नौका) बुडविली जाणार?

या देशात दुर्दैवाने गेल्या ७५ वर्षापासून कॉंग्रेस पक्षासह अनेक राजकीय पक्षांचे परिवारवादाचे राजकारण सुरु होते, त्यातून देशाचे नुकसान झाल्याचे पहायला मिळाले आहे हे सत्य नाकारून चालणार नाही. मात्र त्यावर पर्याय असलेल्या नव्या राजकीय पर्यायाचा २०१४ पासूनचा प्रवास पाहिला तर ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ अशी स्थिती झाली आहे हे कुणीही मान्य करेल. आपला प्रवास टायटँनिक सारखा सुरू आहे ही लोकशाही व्यवस्थांच्या नावाखाली सुरू असलेली परिवारवादाची नौका बुडविली जाणार आहे, त्यामध्ये जुन्या स्वातंत्र्याच्या काळातील इतिहास तथाकथित निती मुल्यांसह, लोकशाही आणि समाजवादी रचना अस्तंगत होत आहेत. मुंबईतून जसा कधीकाळी साम्यवादी विचारांचा खात्मा ठरवून करण्यात आला तसा या देशातून कॉंग्रेस आणि अन्य पक्षांच्या लोकशाही आडून सुरू असलेल्या भाई भतिजावादाला संपविण्याचे पर्यायाने राजकीय पक्षांना संपविण्याचे काम सुरू आहे. मुंबईच्या गिरण्या बद पाडण्यात आल्या कामगार देशोधडीला लागले तरी देशात कपड्याची टंचाई झाली का? नाही ना? असे पटवून दिले गेले. तसेच बौध्दिकांतून उजव्या विचारसरणीचा कब्जा वाढवत अमृतकालात जुन्या व्यवस्था मृतवत केल्या जात आहेत. समाजाचे देशाचे हे स्थित्यंतर पहाताना त्यावर लक्ष द्यायचे, जाणून घ्यायचे आणि गप्प बसायचे. जे जे होईल ते पहावे.. . .  म्हणून आपल्या रोजी रोटी कुटूंबाच्या हिताचा विचार करत मनावर विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घ्यायची तूर्तास इतकेच.

पूर्ण

 

 

 

अमीत शहांच्या मिशन ४५ मध्ये दिग्गज राजकीय घराण्यांची ‘मुले पळविणारी टोळी सक्रीय होणार?; राजकीय वर्तुळात मिश्कील चर्चा!

Social Media