मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा(Parineeti Chopra) आणि आप खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha)लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी साखरपुड्याचे फोटो शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. तेव्हापासून चाहते त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत. मात्र चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाचे अपडेट फायनल झाले आहे.
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा 25 सप्टेंबर 2023 रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांनीही याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यांचा विवाह सोहळा शाही पद्धतीने होणार आहे. त्यांचे लग्न जवळपास आठवडाभर चालणार आहे. या विवाह सोहळ्याला कुटुंबीय, मित्रमंडळी आणि राजकीय आणि चित्रपट जगतातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून परिणीती आणि राघवच्या डेस्टिनेशन वेडिंगच्या बातम्या येत आहेत. हे कपल राजस्थानमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वी या दोघांनी राजस्थानच्या उदयपूर पर्यटन विभागाच्या उपसंचालकांची भेट घेऊन तेथील उत्तम ठिकाणे आणि हॉटेल्सची माहिती घेतली होती. आता हे कपल राजस्थानमध्ये लग्न करणार आणि गुडगावमध्ये रिसेप्शन देणार असल्याच्या बातम्या येत आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांची 13 मे 2023 रोजी दिल्लीत एंगेजमेंट झाली.