कर्मचारी निवड आयोगाने (SSC) SSC CGL, SSC CHSL, SSC LE यासह 2023 मध्ये होणार्या विविध परीक्षांसाठी परीक्षा दिनदर्शिका प्रसिद्ध केली आहे. सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करणारे उमेदवार आयोगाच्या (SSC), ssc.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन परीक्षेचे कॅलेंडर पाहू आणि डाउनलोड करू शकतात. एसएससीने ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात होणाऱ्या परीक्षांचे कॅलेंडर प्रसिद्ध केले आहे.
SSC परीक्षा दिनदर्शिकेनुसार, एकत्रित पदवीधर स्तर परीक्षा (SSC CGL) 2023 (टियर-2) 25, 26 आणि 27 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे. संयुक्त उच्च माध्यमिक (10वी) स्तर परीक्षा (SSC CHSL) 2023 (टियर-2) परीक्षा 2 नोव्हेंबर 2023 रोजी होणार आहे. SSC कनिष्ठ अभियंता किंवा SSC JE (सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि क्वांटिटी सर्व्हेइंग आणि कॉन्ट्रॅक्टिंग) परीक्षा, 2023 (पेपर-2) 4 डिसेंबर रोजी आणि दिल्ली पोलिस आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक (SSC CPO SI) साठी परीक्षा , 2023 (टियर 2) 22 डिसेंबर 2023 रोजी होणार आहे.
परीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षेच्या 10 ते 15 दिवस आधी कर्मचारी निवड आयोगामार्फत घोषित केले जाईल. हे प्रवेशपत्र परीक्षार्थींनी सोबत ठेवावे. अन्यथा उमेदवारांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच, प्रवेशपत्रासोबत आधार कार्डची छायाप्रत आणि पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत ठेवण्यास विसरू नका.