परभणी : जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे ओढे नाले ओसांडून वाहत आहेत .
तर मध्यरात्रीपासून परभणी (Parbhani)पूर्णा- नांदेड(Purna-Nanded) महामार्गावरील माटेगाव येथील धूना नदीला पूर आल्यामुळे, त्याचे पाणी पुलावरून वाहत असल्याने मध्यरात्रीपासून वाहतूक बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही वाहतूक वसमत मार्गे वळविण्यात आली. दुपारनंतर पाणी ओसरल्याने वाहतूक हळू हळू सुरळीत झाली.
दरम्यान ओढे ,नदी परिसरातील सोयाबीन ,कापूस,हळद पिके पाण्याचा प्रवाह वेगाने असल्याने वाहून जात आहेत. पुलावरून पाणी वाहत असताना कोणीही रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन परभणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.